आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रीय गायन:ठुमरीच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध ; स्वरझंकार महोत्सवात व्हायोलिन ड्युएटचा नजराणा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा घराण्याच्या अग्रणी शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी सादर केलेल्या ‘छब शाम की, शाम छबी मन मोह लियो’ ‘करुणा करो बागेश्वरी’ सारख्या बंदिशी आणि “याद पिया के आये’ या सदाबहार ठुमरीच्या सादरीकरणाने औरंगाबादकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. तेजस आणि राजस उपाध्ये यांनी व्हायोलिन ड्युएटचा अप्रतिम असा नजराणा सादर करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

दिवाळीनंतर गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असताना पुण्याच्या व्हायोलिन अकादमीतर्फे ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित स्वरझंकार मैफलीने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तेजस आणि राजस उपाध्ये यांनी राग किरवानीने व्हायोलिन स्वर छेडायला सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यातच तबल्याच्या नादाने वातावरण तरंगमय झाले आणि नादब्रह्म उजळले गेले. व्हायोलिन ड्युएटला तबल्यावर ईशान घोष यांनी उत्तम साथसंगत दिली.

दुसऱ्या सत्रात पतियाळा घराण्यातील शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांच्या शांत, सौम्य नितळ अन् निरागस स्वरांनी मनातली किल्मिषे गळून पडली. विलंबित एकतालातील बंदिश ‘श्याम कल्याण’ उलगडून सांगू लागल्या. त्यानंतर वातावरण सुरावलेले ते “करुणा करो बागेश्वरी’सारख्या बंदिशी आणि “याद पिया के आये’ या सदाबहार ठुमरीच्या माध्यमाने. या मैफलीत तबल्यावर ईशान घोष, हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी तर सारंगीवर मुराद अली यांनी साथसंगत दिली. वैष्णवी कुलकर्णी यांनीही रसिक श्रोत्यांना भावार्थ ऐकवला.

बातम्या आणखी आहेत...