आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला:डिमेन्शिया झालेल्या ज्येष्ठांचा सांभाळ करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिमेन्शिया झालेल्या ज्येष्ठांचा सांभाळ करणे अतिशय संयम, सहनशीलतेचे काम आहे. त्यामुळे अशा ज्येष्ठांचा सांभाळ करणाऱ्यांच्या कामात वाटा घ्या. त्यांच्या कामाचे कौतुक करून प्रोत्साहन द्या. त्यांना सतत प्रेरणा देत राहा, असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृहात (आयएमए) आयोजित कार्यक्रमात डॉक्टरांनी दिला.

“मेंदूला चालना द्या, डिमेन्शियाला दूर ठेवा’ परिसंवादात अल्झायमर डेनिमित्त कार्यक्रम झाला. आयएमए आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डॉ. प्रा. डाॅ. शैलजा राव- सिंग म्हणाल्या, ‘उतारवयात आढळणारा डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) गंभीर आजार असून बहुतांश रुग्णांना अल्झायमरमुळे स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी वैद्यकीय उपचारांसोबत मेंदूला चालना देणाऱ्या गोष्टी केल्यास हा आजार दूर ठेवता येईल.’ अल्झायमर, फेंट्रो टेपोरिल डिमेन्शिया आणि व्हॅस्क्युलर डिमेन्शिया या तीन प्रमुख कारणांनी स्मृतिभ्रंश होतो. यामध्ये सर्वाधिक प्रमाण अल्झायमरमुळे स्मृतिभ्रंशाचे आहे.

डॉ. प्रसाद देशपांडे यांनी सांगितले की, वाढत्या वयातील विसराळूपणाकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. असामान्य वागणूक, बाेलेनासा हाेणे, भान न राहणे, संशय घेणे अशी लक्षणे या आजारात दिसून येतात. यामध्ये औषधोपचारापेक्षा वागणूक सर्वात मोठा दिलासा आहे. अशा व्यक्तीशी प्रेमाने बोला, मालिश करा, यातूून फायदा होईल.

जाणीवपूर्वक संशोधनासाठी काम सुरू
हळूहळू देशात ज्येष्ठांची संख्या वाढत जाणार आहे. त्यामुळे स्मृतिभ्रंश वाढत जाणार आहे. ही एक मोठी समस्या होईल. त्यामुळे आताच यावर जाणीव जागृती चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. घाटीतील मेमरी क्लिनिक याचाच भाग आहे. डाटा संकलन यातील पहिली पायरी आहे. यानंतर संशोधनास सुरुवात होईल. या आजारात एक व्यक्ती नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.- डॉ. मंगला बोरकर, जेरियाट्रिक तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...