आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या पथकाने काढलेले अतिक्रमण पुन्हा ‘जैसे थे’:एन-1 ला अतिक्रमणांचा विळखा; ग्रीन झोन बनला दारूड्यांचा अड्डा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको एन-१ परिसरातील सिडको बसस्थानक तसेच उच्च नागरी वसाहतींना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. तर ग्रीन झोन दारूड्यांचा अड्डा झाला आहे. रस्त्यावरच पन्नास हातगाड्या उभ्या राहतात. त्यांच्यासमोर ग्राहकांचा घोळका असतो. त्यामुळे दोनपदरी रस्ता एक पदरीच झाला आहे. त्यातून वाहन चालवणे, मार्ग काढणे, ये-जा करणे या परिसरातील नागरिकांना अतिशय कठीण होत आहे, अशी तक्रार या परिसरातील नागरिकांच्या वतीने अमरजीत पाटील यांनी ईमेलद्वारे पोलिसांकडे केली आहे. पोलिस प्रशासन व मनपा अतिक्रमण विभागाने तातडीने अतिक्रमण हटवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टाऊन सेंटर, एन-वन परिसरात राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी संकुल, सिडको बसस्थानक, ग्रीन झोन आदींचा समावेश आहे. मात्र, सर्व्हिस रोडवर हातगाड्या, चहा, नाष्टा विक्रेत्यांची वाहने उभी केली जातात. ग्रीन झोनमध्ये दारूड्यांच्या पार्ट्या, देहविक्री खुलेआम सुरू आहे. नशा करणाऱ्या लहान मुलांनी उच्छाद मांडला आहे. रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांवर दादागिरी केली जाते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते. किरकोळ अपघातही होत आहेत. परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. मनपाचा अतिक्रमण विभाग थातूरमातूर कारवाई करतो. त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दखल घेऊन अवैध व्यवसाय, अतिक्रमणांवर कारवाई करावी, सीसीटीव्ही बसवावे, अशी मागणी अमरजीत पाटील यांनी तक्रारीत केली आहे.

बातम्या आणखी आहेत...