आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीची कोंडी:अतिक्रमण पथकाची कॅनॉटमध्ये कारवाई; विक्रेत्यांचे सामान जप्त

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता सिडकोतील कॅनॉट परिसरात अचानक कारवाई केली. त्यामुळे पथविक्रेते आणि ठेलेवाल्यांची धावपळ उडाली. पथकाने अनेकांचे सामान जप्त केले. मागील महिन्यात कॅनॉटमधील १२७ दुकानांसमाेरील शेड काढून रस्ता मोकळा केला हाेता तरीही अनेकांनी फुटपाथवर हॉटेलचे टेबल लावून ग्राहकांना बसण्याची सोय केली. अनेक पथविक्रेते, ठेलेवाले रस्त्यात गाडी लावत हाेते. त्यामुळे पुन्हा वाहतुकीची कोंडी होत होती. सोमवारी पथकाने १० ते १५ दुकानांचे सामान जप्त केले.

बातम्या आणखी आहेत...