आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक कमल तलावालगतचे अतिक्रमणे काढले:महानगरपालिका अतिक्रम हटाव पथकाची कारवाई

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिका अतिक्रम हटाव पथकाने मंगळवारी ऐतिहासिक कमल तलाव लागत असलेले अतिक्रमणे हटवले. मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी आणि जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार संयुक्त कारवाई करण्यात आली.

शहरातील प्रसिद्ध ऐतिहासिक कमल तलाव बाबत जिल्हाधिकार्यांनी एक समिती तयार केली आहे. या समितीमध्ये महानगरपालिका ,पोलिस विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे.

सदर अतिक्रमण काढणे बाबत मागील सहा महिन्यापासून या परिसराची वेळोवेळी पाहणी करण्यात आली आहे. ऐतिहासिक कमल तलावा लगत आणि तलावांमध्ये एकूण नऊ अतिक्रमण धारका विरुद्ध आज कारवाई करण्यात आली. या अतिक्रमणामध्ये कच्चे पक्के बांधकाम होते. तर काही लोकांनी तलावामध्ये पत्र्याचे शेड तयार करून या ठिकाणी निवासी वापर सुरू केला होता.

या ऐतिहासिक कमल तलावामध्ये विविध प्रकारचे पक्षी येतात. परंतु या ठिकाणी अतिक्रमण धारकांनी आपल्या ड्रेनेज लाईन आणि इतर घाण पाणी सोडले होते. यामुळे अनेक पक्षी या ठिकाणी येत नाही. या तलावाच्या सुंदरतेला बाधा निर्माण होत होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी न्यायालयात प्रथम प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे विरुद्ध याचिका दाखल केली होती.

या बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुद्धा आपला अभिप्राय नोंदवून न्यायालयात अतिक्रमण काढण्याबाबत शपथपत्र दाखल केले होते .त्या अनुषंगाने कमल तलावाची जागेची मालकी ही शासनाची असून जागेचे मोजमाप नगर भूमापन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. या ठिकाणी जे अतिक्रमण धारक आहे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क चे कागदपत्र नाही. कोणाकडे पी आर कार्ड पण सुद्धा नसल्याने अतिक्रमणे काढण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम आणि अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये,इमारत निरीक्षक सय्यद जमशेद ,रवींद्र देसाई,सहायक आयुक्त तथा वार्ड आशिकरी संजय सुरडकर,पोलीस निरीक्षक फईम हाश्मी, बेगमपुरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पोतदार , तसेच नगर भूमापन कार्यालयाचे प्रतिनिधी आणि इतर कर्मचाऱ्यांनी कारवाई सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...