आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण काढण्याची मोहीम:सेंट्रल नाका ते आझाद चौक रस्त्यातील अतिक्रमणे हटवली

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जी-२० परिषदेनंतर शहरात लगेचच अतिक्रमण काढण्याची मोहीम सिडको भागात सुरू करण्यात आली. शुक्रवारी (३ मार्च) महापालिकेचा तब्बल २ कोटी रुपयांचा भूखंड अतिक्रमण हटवून मोकळा करण्यात आला. त्याचबरोबर सिडको एन-६, सेंट्रल नाका ते आझाद चौक येथील रस्त्यात अडथळा ठरणारी ३२ अतिक्रमणे हटवण्यात आली.

महापालिकच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून २ मार्चपासून सिडको भागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी बजरंग चौक ते साईनगर येथील मनपाच्या शॉपिंग मॉल दुकानालगत एका मोठ्या खुल्या प्लॉटवर अज्ञात व्यक्तीने सिमेंटचे खांब लावून तार फेन्सिंग केली होती. येथे गेट बसवून आजूबाजूला पत्रे लावले होते. अतिक्रमण हटाव पथकाने अतिक्रमणावर जेसीबी चालवून साहित्य जप्त केले. यामुळे पालिकेचा भूखंड मोकळा झाला आहे तसेच एन-६ सेंट्रल नाका ते आझाद चौक या रस्त्यावर नागरिकांनी तात्पुरते पत्र्याचे शेड, तर काहींनी पक्के बांधकाम करून गॅरेज, इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री, पान शॉप, प्लायवूड विक्री अशी दुकानदारी थाटली होती. ही सर्व अतिक्रमणे पाडण्यात आली.

शुक्रवारी कारवाईनंतर आझाद चौक ते सेंट्रल नाका प्रशांत बिअर बारलगत असलेल्या सर्व दुकानदारांना मार्किंग करून देण्यात आले आहे. त्यांची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू राहील, असे मनपा प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...