आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:एंड्रेस प्लस हाऊजर औरंगाबादेत करणार 300 कोटींची गुंतवणूक, सध्याच्या मनुष्यबळात दुपटीने वाढ होणार

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंड्रेस प्लस हाऊजर कंपनीच्या (व्हेटझर) औरंगाबादेतील विस्तारीकरणाला शुक्रवार, ३ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. २०१३ ला सुरू झालेल्या या बहुराष्ट्रीय कंपनीच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन हाेणार आहे. या प्रकल्पात सुमारे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षांत ‘एंड्रेस प्लस हाऊजर’ समूह एकूण ३०० कोटीं रुपयांची भरीव गुंतवणूक करणार आहे. यामुळे मनुष्यबळ दुप्पट होणार असल्याची माहिती ‘व्हेटझर’चे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली.

जेएनईसी महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बाेलताना ते म्हणाले, ‘एंड्रेस प्लस हाऊजर ग्रुपचे शहरात चार प्लांट आहेत. यापैकी ‘व्हेटझर’च्या विस्तारीकरणासाठी पहिल्या टप्यात तब्बल साठ हजार चौरस फुटांचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रकल्पात सुमारे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यापैकी ३५ कोटींचा खर्च बांधकामावर केला जाईल. तर दुसऱ्या टप्यात ५० हजार चौरस फुटांचे बांधकाम होईल. हे बांधकाम ‘लिक्विझर’ प्लांट राहणार आहे.

आत्तापर्यंत एंड्रेस प्लस हाऊजर ग्रुपने औरंगाबादेतील चार कंपन्यांमध्ये सुमारे ४०० कोटींची गुंतवणूक केली आहे. पुढील तीन वर्षांत आणखी ३०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. गरज पडल्यास ही गुंतवणूक एक हजार कोटींपर्यंत नेण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. सध्या भारतासह दक्षिण आशियात बाजारपेठ असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. विस्तारीकरण व नवनिर्माण हे आमचे ध्येय आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. शहरातील प्लांटमधून सध्या टेम्परेचर मेजरिंग, सिस्टिम प्रॉडक्ट्स यामध्ये विशेषत: रेकॉर्डर, इंडिकेटर आणि पावर सप्लाय असे उत्पादन घेतले जाते. पहिल्या प्रकल्पाचे काम २०२२ च्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...