आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थात्मक प्रशिक्षण:ब्रह्माकुमारीजतर्फे ऊर्जा संवर्धन जनजागृती ; ऊर्जा स्रोतावर केले मार्गदर्शन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाऊर्जा, ब्रह्माकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशक्ती भवन सभागृहात इंधन संवर्धनावर संस्थात्मक प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यात महाऊर्जा सौर प्रकल्प अधिकारी आशिष लिबडे व माउंट अबू राजस्थान येथील अभियंता ब्रह्माकुमार सेल्वम यांची प्रमुख उपस्थिती होती. ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी पीपीटीद्वारे ‘शाश्वत विकासासाठी ऊर्जा स्रोत’ या विषयावर मार्गदर्शन केले. उपसेवा केंद्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी शांतादीदी, पूर्व पोलिस निरीक्षक रघुनाथ पुके यांच्या हस्ते महाऊर्जा जनजागृती भित्तिपत्रकाचे अनावरण केले. अभियंता ब्रह्माकुमार सेल्वम यांनी ब्रह्माकुमारीज यांच्या इंडो जर्मन प्रकल्पसारख्या लक्ष्यकेंद्री कार्यक्रमाची गरज अधोरेखित केली. समारोप इंधन संरक्षण प्रतिज्ञेने करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...