आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक संशोधन परिषद:अल्पसंख्याक शाळांमध्ये इंग्रजीही प्रथम भाषा विषय

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये आता विद्यार्थ्यांना मातृभाषेबरोबरच इंग्रजीही प्रथम भाषा म्हणून शिकण्याची संधी मिळेल. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने याबाबतचे आदेश शिक्षण विभाग व संबंधित शाळांना पाठवले आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय ऐच्छिक असेल.

जिल्ह्यात ६३० अल्पसंख्याक शाळा असून त्यात साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. आतापर्यंत या विद्यार्थ्यांना मातृभाषा ही प्रथम भाषा व हिंदी अथवा संस्कृत द्वितीय भाषा विषय म्हणून तर इंग्रजी तृतीय भाषा म्हणून शिकवला जात होता. पण इंग्रजी शाळांमध्ये आता मराठी हा विषय प्रथम भाषा म्हणून शिकण्याची संधी आहे. परंतु गुजराती उर्दू आदी भाषिक विद्यार्थ्यांच्या शाळात ही सोय नव्हती. मात्र आता हा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दोन भाषा प्रथम भाषा म्हणून शिकता येतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...