आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी पेपर:चार जिल्ह्यांत इंग्रजी माध्यमाचे पेपर मराठीतून सोडवण्याची मुभा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचा न्यूनगंड असतो. त्यामुळे इच्छा असूनही ते इंग्रजी माध्यमात प्रवेश घेऊ शकत नाहीत. पण आता त्यांची ही अडचण दूर होणार आहे. एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका इंग्रजीत असली तरी त्यांना मराठी किंवा हिंदीतून उत्तरे लिहिता येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ५५ विभाग, कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील ४८५ कॉलेजांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू असेल. पदवी, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल.

नवीन शैक्षणिक धोरण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी गुरुवारी विद्यापीठात संलग्न कॉलेजच्या प्राचार्यांची सहविचार सभा झाली, या वेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अनेक निर्णय जाहीर केले. मराठीतून उत्तरपत्रिका स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासह विज्ञान, व्यवस्थापनच्या सर्व अभ्यासक्रमांना या प्रक्रियेत आणले आहे. पुढील वर्षापासून तर पाठ्यक्रमच प्रादेशिक भाषेत शिकवला जाणार आहे. असे नियोजन केले जात आहे. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांनी बदलाबाबत सादरीकरण केले. डिजीलॉकरमध्ये २.३५ लाख डॉक्युमेंट अपलोड केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची डिजी लॉकरवर नोंदणी करणे ही प्राचार्यांची जबाबदारी आहे. स्टार्टअपसाठी विद्यापीठातील अटल इन्क्युबिशन सेंटर कॉलेजला मदत करतील असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले. प्राचार्यांच्या अनेक शंकांचेही त्यांनी निरसन केले.

‘एबीसी’द्वारे डिजिटल रेकॉर्ड
प्रत्येक सत्रातील क्रेडिट स्कोअर डिजी लॉकरमध्ये सेव्ह केला जाईल. या पद्धतीला ‘अ‍ॅकडमिक बँक क्रेडिट’ (एबीसी) म्हणतात. जर विद्यार्थ्याने तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल अन् त्याने एक वर्षाने तो कोर्स सोडला. तर त्याचे एक वर्षाचे क्रेडिट स्कोअर एबीसीमध्ये सेव्ह असेल. यावर क्लिक केले तर स्टेट आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी असे ऑप्शन ओपन होतील. त्यातील स्टेटला क्लिक केले तर त्यात प्रादेशिक विद्यापीठांची यादी येईल.

मल्टिपल एक्झिट अँड एंट्री
पदव्युत्तरसाठी पूर्वीपासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम (सीबीसीएस) होते. आता पदवी स्तरावरही मल्टिपल एक्झिट, मल्टिपल एंट्रीची सोय असेल. तीन वर्षांचा कोर्स असेल तरी पहिले वर्ष शिकून विद्यार्थी बाहेर पडू शकतात. त्यांना सर्टिफिकेट कोर्स ऑफ अंडरग्रॅज्युटचे प्रमाणपत्र मिळेल. दुसऱ्या वर्षी एक्झिट घेतली तर ‘डिप्लोमा इन अंडर ग्रॅज्युअट’ व तिसऱ्या वर्षी पदवीच दिली जाईल. विद्यार्थी तीन वर्षाच्या कोर्समध्ये कधीही पुन्हा एंट्री करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...