आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:शाळा बंदच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एका इंग्रजी शाळेला दहा हजाराचा दंड, हिंगोली पालिकेची कारवाई

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात शाळा, महाविद्यालये बंदचे आदेश असतांनाही वह्या जमा करण्याच्या नावाखाली पालकांना व विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविणाऱ्या सॅकर्ड हार्ट इंग्लीश स्कुलला गुरुवारी ता. ८ हिंगोली पालिकेच्या पथकाने १० हजार रुपये दंड ठोठावला आहे.

हिंगोली शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यासाठी प्रत्येकानेच काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. या शिवाय जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. त्यानुसार शहरातील सर्वच शाळा , महाविद्यालये बंद आहेत. या सोबतच व्यापारी प्रतिष्ठाणे देखील बंद असून ज्या ठिकाणी व्यापारी प्रतिष्ठाणे सुरु आहेत त्या ठिकाणी हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

दरम्यान, आज शहरातील सॅकर्ड हार्ट इंग्लीश स्कुलने वह्या जमा करण्याच्या नावाखाली पालक व विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार काही पालक व विद्यार्थी शाळेत हजर झाले. मात्र या प्रकाराची माहिती मिळताच पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, कर्मचारी बाळू बांगर, बी. के. राठोड, देविसिंह ठाकूर, गजानन हिरमेठ यांच्यासह पोलिस कर्मचारी सुधीर ढेंबरे यांच्या पथकाने अचानक शाळेत येऊन पाहणी केली. यामध्ये शाळेत विद्यार्थी व पालक आढळून आले. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी शाळेला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर दंड भरल्यानंतर शाळा बंद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...