आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा फटका:पहिलीच्या वर्गात प्रवेश झाला पण शाळाच पाहिली नाही, 77 हजार 68 विद्यार्थींना प्रतीक्षा नव्या वर्गाची, पाटीवर उमटणाऱ्या पांढऱ्या अक्षरांची

औरंगाबाद । विद्या गावंडे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केस. क्रमांक एक - ऐ बाबा सांग ना मी कधी शाळेत जाणार आहे. मागच्या वर्षी माझा शाळेत प्रवेश झाला. आता मी दुसरीच्या वर्गात आले.पण माझा वर्गच अजून मी पाहिला नाही. असा प्रश्न हर्सूल परिसरात राहणाऱ्या काव्या वाघ या चिमुकलीने तिच्या आई बाबांना केला आहे. केस क्रमांक दोन - यावर्षी माझ्या मुलाला शाळेत टाकले आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळाच उघडल्या नाही. ऑनलाइन लहान मुलांचे काही वर्ग होत नाहीत. सामाजिक माध्यमाच्या ग्रृपवर एखादा व्हिडिओ, गाणी शेअर केली जातात. पण मुल त्यालाही कंटाळली आहेत. मुलगा तर म्हणतो मला शाळेत कधी टाकणार प्रवेश होवूनही मुलगा घरीच आहे. असे पालक मनिषा सोनवणे यांनी सांगितले.

शाळेत प्रथमच जाणाऱ्या प्रत्येक पाल्याच्या पालकांची अशीच काहीशी भावना आहे. आपल मुल पहिल्यांदाच शाळेत जाणार, मग थोडी रडारड, चॉकलेट देवून समजावण, नवीन उजळणी, अक्षरओळख, नवी कोरी पाटी, वॉटर बॅग थोडे रुसवे फुगवे प्रत्येक घरात शाळेत प्रथमच जाणाऱ्या मुलांची ही चित्र पहाण्यास पालकही उत्सुक झाले आहेत. परंतु शाळेत प्रवेश झालेल्या औरंगाबाद जिल्हयातील पहिल्या वर्गातील ७७ हजार ६८ चिमुकले या अनुभवाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. शैक्षणिक नुकसान होवू नये. म्हणून ऑनलाइन वर्ग सुरु करण्यात आले आहेत.परंतु पहिलीच्या वर्गात जाणारी मुले ऑनलाइन कशी शिकणार ? त्यांना तर मायेचा स्पर्श, समोर उभ्या राहणाऱ्या बाई स्वत: गाऊन शिकवणारी ताई, छान छान गोष्टी, प्राण्यांचे आवाज या भावविश्वाची ओळख हवी असते. कोरोनाची भिती प्रत्येकालाच आहे. मुलांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. पण शाळेत नाव टाकल्यावरही शाळा कशी हे पाहण्यासाठी चिमुकले प्रतिक्षेत आहेत. सर्वच वर्ग आता सुरु केले पाहिजेत असे मत, शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

"अशी आहे शाळा न पाहता पहिल्या वर्गातून दुसरीच्या वर्गात गेलेले विद्यार्थी आकडेवारी"

२०१९-२० ८८१८९ २०२१-२२ - ८७६९२

पहिलीच्या वर्गात प्रवेश झालेली विद्यार्थी संख्या
२०१९-२० - ८८३२९
२०२०-२२- ७७०६८

"इयत्ता पहिलीत मुलाचा होणारा प्रवेश हा त्याच्या शालेय जीवनाचा प्रारंभ असतो, आईचे बोट धरून कौटुंबिक वातावरणातून मुलांचा शालेय जीवनात होणारा प्रवेश ही सामाजिक व मानसशास्त्रीय दृष्ट्या मोठी घटना असते. बाल गीत, बडबड गीते, गोष्टी खेळ, आणि मग होणारी अक्षर व अंक ओळख, नवे मित्र, मैत्रिणी, शाळेतील शिक्षक,शाळा मुलांना आपली वाटू लागते. गेल्या वर्षांपासून सतत इयत्ता पहिलीच्या दोन बॅच मधील आमची मुलं या सर्व अनुभवापासून पारखी झाली आहेत. ही शिक्षक म्हणून खूप वेदना देणारी आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, पण त्या बरोबर मानसिक, व सामाजिक, भावनिक नुकसान मोठे आहे."- डॉ रूपेश मोरे शिक्षक मराठा हायस्कुल

बातम्या आणखी आहेत...