आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशनच्या वतीने आयाेजित आयसा इंजनिअरिंग एक्स्पोला दुसऱ्याच दिवशी ७ हजार विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. हे प्रदर्शन १६ डिसेंबर रोजी अयोध्यानगरी, आरटीओ ऑफिससमोर सुरू असून आणखी दोन दिवस म्हणजेच १९ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे.
यात देशभरातील १५० पेक्षा अधिक उद्योगांनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशी ३७००, तर दुसऱ्या दिवशी ७ हजार जणांनी भेट दिली. यात औरंगाबादसह जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातून उद्योजक, कर्मचारी, विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रदर्शनात इंडस्ट्री ४.० या विषयावर परिसंवाद झाला. आयसाचे अध्यक्ष सूरज डुमणे, सचिव दत्तात्रय बेदाडे, मिलिंद उमदीकर, प्रकल्पाचे सहसंयोजक, ग्लोब टेकचे सतीश मंडोले यांनी भेट देण्याचे आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.