आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य लढ्यात उद्योजकांची भूमिका:गांधीजींच्या पाचव्या पुत्रासारखे होते उद्योजक जमनालाल बजाज

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक उद्योगपतींनी पैसा ओतला होता. मात्र, पैशांसोबतच एका उद्योगपतीने जमिनीवरील संघर्षात मोलाचे योगदान दिले होते. ते आहेत बजाज समूहाचे संस्थापक जमनालाल बजाज. त्यांनी गांधीजींना वर्धेला आंदोलनाचे केंद्र बनवण्यासाठी २० एकर जमीन दान केली. तिथे आजही गांधी आश्रम आहे. बजाज यांनी असहकार आंदोलन, नागपूर झेंडा सत्याग्रह, सायमन कमिशनवर बहिष्कार, दांडीयात्रेत भाग घेतला. यानंतर त्यांना अटक झाली. ते दोन वर्षे नाशिक तुरुंगात राहिले.

१९४२ मध्ये गांधींनी ‘हरिजन’मध्ये बजाज यांच्याबद्दल लिहिले, माझ्या प्रत्येक कामामध्ये मला त्यांनी तनमनधनाने संपूर्ण सहकार्य केले. राजकारणाबद्दल ना त्यांना आकर्षण होते ना मला. ते ताणले गेले होते, कारण मी होतो. जमनालाल यांनी जीवनात सुमारे २५ लाख रुपये दान केले होते. त्यांनी दोन दशके काँग्रेससाठी नियमित फायनान्सर म्हणून काम केले व व्यापारात विश्वस्तपदाची संकल्पना मांडली. १९४२ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहताना गांधींनी लिहिले, मी धनाढ्य लोकांना भल्यासाठी आपल्या धनाचा विश्वस्त बनण्याबाबत लिहिले तेव्हा माझ्या डोक्यात हाच मर्चंट प्रिन्स होता.

संस्मरणीय : देशाची पहिली कापड गिरणी बॉम्बे स्पिनिंग अँड वीव्हिंग कंपनीने देशाची पहिली कापड गिरणी मुंबईच्या ताडदेवमध्ये ७ जुलै १८५४ रोजी स्थापन केली होती. पारशी व्यावसायिक कावसजी नानाभाई दावर याचे संस्थापक होते.

७५ वर्षांतील कामगिरी
-भारत जगातील स्टीलचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक. २०२१-२२ मध्ये १२ कोटी टन उत्पादन.
-भारत गव्हाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक. २०२२ मध्ये १,११३ लाख टन गव्हाचे उत्पादन झाले.
-दुग्ध उत्पादनात भारत जगात सर्वात पुढे आहे. जगाच्या २३% दुग्ध उत्पादन भारतात होते.
-भारत जगात सोन्याच्या दागिन्यांचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक व दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे.

बातम्या आणखी आहेत...