आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विजयी भव’ प्रकल्पाचा प्रारंभ:उद्योजकांनी शिशुविकास शाळेला दिली 10 लाखांची प्रयोगशाळा

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लोबल एक्स्पर्ट सोल्युशन्सचे संस्थापक प्रशांत देशपांडे यांनी श्रेयनगरमधील शिशुविकास मंदिर शाळेला १० लाखांचा संगणक कक्ष आणि ई-लायब्ररी उभारून दिली. उडान डिजिटल टेक्नॉलाॅजी सेंटरतर्फे ‘विजयी भव’ प्रकल्पास प्रारंभ झाला आहे. याचा लोकार्पण सोहळा शिशुविकास मंदिर शाळेत रविवारी झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मर्सिडीज बेंझ इंडियाचे कार्यकारी संचालक व्यंकटेश कुलकर्णी, सुलोचना नाईक, डॉ. संगीता देशमुख, उपाध्यक्ष उषा देशपांडे, मंदा देशपांडे उपस्थिते होते.

देशपांडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी परिश्रम घेणारी ही शाळा आहे. आजच्या काळात डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल.’ कोरोनाकाळात देश ठप्प झाला. पण डिजिटलवर वेगाने कामे सुरू होती. याचाच अर्थ तंत्रज्ञान हा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे यावर शालेय जीवनापासूनच लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

ऋण फेडण्याचे काम केले माझा मुलगा प्रशांत, मुलगी मेघा यांनी ऋण फेडण्याच्या उद्देशातून २ महिन्यांत हा प्रकल्प उभा केला. माझे पती डॉ. विजय देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केलेल्या या कामाचा नक्कीच मुलांना उपयोग होईल. -मंदा देशपांडे, माजी शिक्षिका

मुलांच्या माध्यमातून विकास शक्य काळ वेगाने बदलतो आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच मुलांना तंत्रज्ञानाच्या पातळीवरही विकसित करणे गरजेचेे आहे. शाळेची एवढी ताकद नसते. मुलांच्या माध्यमातून हा विकास शक्य आहे. -डॉ. संगीता देशमुख

बातम्या आणखी आहेत...