आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी वसुंधरा अभियान:​​​​​​​पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांनी जाणून घेतले हिंगोली पालिकेचे आगामी काळातील नियोजन; अभिनेता अमीर खान यांचीही उपस्थिती

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता अमीर खान यांनी दिले आश्‍वासन

माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या हिंगोली पालिकेच्या कामकाजाचे कौतूक करून पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांनी पालिकेचे आगामी काळातील नियोजन जाणून घेत शासनाकडून अपेक्षाही जाणून घेतल्या. यावेळी सिने अभिनेता अमीर खान यांनीही पाणी फाऊंडेशन बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात माझी वसुंधरा अभियानात हिंगोली पालिकेने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर गुरुवारी ता. १७ पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे, सिने अभिनेता अमीर खान, पर्यावरण विभागाच्या सचिव डॉ. मनिषा म्हैसकर यांनी राज्यातून क्रमांक मिळविलेल्या पालिकांशी व्हिडीओ काँन्फरंन्सींगद्वारे संवाद साधला.

यावेळी हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी मागील वर्षभरात माझी वसुंधरा अभियानात केलेल्या कामांचा लेखाजोखाच मांडला. माझी वसुंधरा अभियानात केलेल्या सर्वच कामांची माहिती दिली. जल, वायू, पृथ्वी यावर केलेल्या कामांची माहिती दिली. पालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांचे पर्यावरण मंत्री ठाकरे, अभिनेता अमीर खान यांनी कौतूक केले.

दरम्यान, आगामी काळात राबविल्या जाणाऱ्या योजनांचीही डॉ. कुरवाडे यांनी माहिती दिली. हिंगोली शहरात ३० हजार झाडे लाऊन त्याचे संगोपन केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व ओपन स्पेस (मोकळ्या जागेत) लोकसहभागातून झाडे लाऊन त्याचे संगोपन केले जाणार आहे. तसेच शहरात असलेल्या पुरातन कालीन सहा बारवांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या बारवांतून पाणी उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहेत.

या शिवाय हिंगोली जिल्हयाची वाहिनी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या कयाधू नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार असून परिसरातील सौंदर्यीकरण केले जाणार आहे. या शिवाय फुलझाडांची फुले रस्त्यावर पडून रस्त्याचे पर्यायाने शहराचे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी फ्लॉवर स्ट्रिट तयार केले जाणार असल्याचे डॉ. कुरवाडे यांनी सांगितले. पालिकेच्या या नियोजनाचे पर्यावरण मंत्री ठाकरे, अभिनेता अमीरखान, सचिव डॉ. म्हैसेकर यांनी कौतूक केले. शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन ठाकरे यांनी यावेळी दिले.

डॉ. कुरवाडेंनी मांडल्या दोन महत्वाच्या सुचना

यावेळी शासनासाठी काय सुचना मांडणार या मुद्यांवर डॉ. कुरवाडे यांनी मराठवाडयात मोठ्या नद्या नाहीत. त्यासाठी आहे त्या नद्यांचे पुनरुज्जीवन केल्यास पाणी उपलब्ध होऊ शकेल. तसेच सर्व शासकिय कार्यालयांना रुफवॉटर हार्वेस्टींग बंधनकारक केले पाहिजे. त्यातून पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवल्या जाईल.

अभिनेता अमीर खान यांनी दिले आश्‍वासन
पाणी फाऊंडेशन ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविले जात आहे. त्याचा चांगला परिणाम ग्रामीण भागातून दिसून आला आहे. त्याच धर्तीवर पाणी फाऊंडेशन शहरी भागात राबविल्यास शहरातही पाणी प्रश्‍न मार्गी लागू शकतो अशी अपेक्षा डॉ. कुरवाडे यांनी व्यक्त केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन सिने अभिनेता अमीर खान यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...