आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत आधार अपडेटच्या सूचना:तब्बल 25 लाख 30 हजार 218 मुलांच्या कार्डमध्ये आढळल्या त्रुटी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार सक्तीचे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार अद्यावत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पहिली ते बारावीपर्यंतच्या तब्बल 25 लाख 30 हजार 218 विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असल्याचे आढळले.

31 ऑगस्टपूर्वी कार्ड अपडेट करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. या कामात मागे असलेल्या पाच जिल्ह्यांची पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयात सोमवारी वैयक्तिकरित्या चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली.

आयुक्तांनी दिल्या सूचना

आधारकार्ड अपडेट असेल तर त्यावर संचमान्यता करण्यात येईल, असे आदेश मागील वर्षी होते. परंतु, यातील प्रमुख अडचणी आणि समस्या दूर न होता पुन्हा मागील वर्षी रखडलेले आधार कार्ड अपडेटचे काम यावर्षी देखील सुरt झाले आहे. परंतू, आधार कार्ड अपडेट करण्यास अनेक जिल्हे कानाडोळा करत आहेत. आधार अपडेट करण्याच्या कामात मागे असणाऱ्या जिल्ह्यांची आता पुण्यात बोलावून वैयक्तिकरित्या चौकशी केली जाणार आहे. शिक्षण आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार आधार अपडेटमध्ये सध्या मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद व लातूर हे पाच जिल्हे मागे आहेत. या संदर्भात सर्व जिल्हयांमधील शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या आधार अद्यावतची प्रक्रिया 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करायची आहे. याबाबत संबंधित जिल्हयांना कामाची गती वाढविण्याच्या सूचनाही शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत.

2 लाख विद्यार्थ्यांचे आधार अपडेट नाही

तर औरंगाबाद जिल्हयात 2 लाख 12 हजार विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही असेही साबळे म्हणाले. या आधार अद्यावत नसल्याने विद्यार्थ्यांचेच नुकसान होणार आहे.त्यांना कुठल्याही योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतील.या बाबत वारंवार शाळांना सूचित केले आहे.तरी देखील शाळा गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. अनेक नामांकित इंग्रजी माध्यमातील शाळांचा यात समावेश आहे. अशा एकेक शाळेचे हजार हजार विद्यार्थी आधार अद्यावत होणे बाकी आहे. यावर सोमवारी चर्चा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...