आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सुविधा:पैठण, गंगापूर, शेंद्र्यात सुरू होणार ईएसआय रुग्णालये, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सुविधा : डॉ. भोसले

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये आतापर्यंत पाच ईएसआयसी रुग्णालयाची सुविधा होती. ती वाढवून आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सेवा देण्यात येणार आहे. येत्या तीन-चार महिन्यांत पैठण, गंगापूर, शेंद्रा येथे रुग्णालये सुरू होतील. त्यासाठी जागांची पाहणी झाली आहे, अशी माहिती ईएसआयसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विवेक भोसले यांनी दिली. “दिव्य मराठी’तर्फे ३१ मार्च रोजी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. भोसले बोलत होते.

ते म्हणाले की, प्रधान सचिव डॉ.नीलिमा केरकट्टा, मुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब धुळाज यांच्या पुढाकाराने अधिकाधिक सुविधा मराठवाडाभर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. सध्या सव्वादोन लाख विमाधारकांना उपचार देण्यात येतात. कामावर असताना अपघात तथा मृत्यू झाल्यास, गर्भवती महिलांना प्रसूतीच्या काळात, काम करताना अवयव निकामी झाल्यानंतर, नैसर्गिक आपत्तीमुळे नोकरीवर गदा आल्यास, राज्य विमा कामगार योजनेअंतर्गत पाच प्रकारचे लाभ दिले जातात. गंभीर आजारांमध्येही विमा कामगार योजनेअंतर्गत उपचारांची सुविधा आहे. यासाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसोबत टायअप केले आहे. यामध्ये हृदयरोग, किडनी आणि कॅन्सरसारख्या आजारांवर उपचारांसाठी मदत मिळते. २०१७ मध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटही करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली. या वेळी डॉ. बनसोड यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

सुनेत्र, श्रमश्री दोन नवीन उपक्रम : ‘आजादी का अमृत महोत्सव’निमित्त ४० ते ५० वयोगटासाठी सुनेत्र आणि श्रमश्री हे दोन नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. नेत्रविकारांसंबंधी उपचारांसाठी “सुनेत्र’ योजना आहे, तर “श्रमश्री’ मध्ये ईसीजी, ब्लड, शुगर, ब्लडप्रेशरसह अन्य तपासण्या करण्यात येत आहेत. यासाठी तपासणी शिबिर घेऊन जनजागृती केल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

कोविडनंतर समुपदेशन
कोविडनंतरच्या समस्या व समुपदेशन या सुविधा ईएसआयसी उपलब्ध केल्या आहेत. यात मानसोपचार तज्ञ आठवड्यातून पाच दिवस समुपदेशन करतात. पाच दिवस त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर ओपीडीमध्ये सेवा देत आहेत. कंत्राटी तत्त्वावर स्पेशालिस्ट डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे डॉ. भोसले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...