आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिकलठाण्यातील ईएसआयसी हॉस्पिटल (कामगार विमा रुग्णालय) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामगारांसाठी महत्त्वाचे आहे. २ लाख २४ हजार ७५१ कामगार आणि त्यांचे कुटुंबीय अशा एकूण ११ लाख लोकांसाठी महत्त्वाचे आहे. येथे रुग्णसेवेसाठी डॉक्टरपासून कर्मचाऱ्यापर्यंत २१३ जणांची गरज आहे. त्यापैकी फक्त १२२ जण कार्यरत आहेत. एकीकडे दरमहा रुग्णसंख्या वाढत असताना ४२ टक्के मनुष्यबळावर काम सुरू आहे. या तुटवड्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने हे रुग्णालय केंद्राच्या योजनेत समाविष्ट करावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. ती पूर्ण झाल्यास १०० बेडचे हे रुग्णालय २०० बेडचे होईल. अनेक सुविधाही वाढतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये १९९७ मध्ये राज्य कामगार विमा रुग्णालय सुरू झाले. सुरुवातीच्या काळात डॉक्टरांची संख्या पुरेशी असल्याने ते रुग्णासाठी आधार ठरत होते. मात्र डॉक्टरांची बदली, निवृत्तीनंतर पुन्हा भरती झाली नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
एमआरआय, सीटी स्कॅनची सुविधा मुंबईत कांदिवलीतील कामगार विमा रुग्णालय केंद्रीय आरोग्य विभागामार्फत चालवले जाते. त्याच धर्तीवर चिकलठाण्याचे रुग्णालयही केंद्राने चालवले एमआरआय, सीटी स्कॅन,आयसीयू, डायलिसिस सारख्या इतर अनेक सुविधा मिळू शकतील. मी त्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे खासदार इम्तियाज म्हणाले.
अनेक वर्षांपासून पाठपुरावा हे रुग्णालय केंद्राकडे द्यावे यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. मात्र, छत्रपती संभाजीनगरचा निर्णय होत नाही. तो झाला तर लाखो कामगारांना फायदा होईल. - विनोद फरताडे, स्थायी समिती सदस्य, ईएसआय कॉर्पोरेशन
डॉक्टरांची ६० टक्के पदे रिक्त १ लाख १८ हजार २१ रुग्णांच्या रक्त-लघवीची तपासणी येथे वर्षभरात झाली आहे. ईएसआयसीमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना डॉक्टरांची संख्या मात्र सातत्याने कमी होत आहे. म्हणून कंत्राटी डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. येथील डाॅक्टरांची १० पैकी ६ जागा रिक्त आहेत. केवळ चार डाॅक्टरांवर रोजच्या रुग्णसेवेचा भार पडत आहे. पुढील महिन्यात चारही डॉक्टर निवृत्त होणार आहेत. चतुर्थ श्रेणीतील ११७ पैकी ७४ जागा रिक्त आहेत. हे प्रमाण ६३ टक्के इतके आहे. या रुग्णालयात एकूण २१३ पैकी ९१ पदे रिक्त आहेत.
डाॅक्टरांच्या ६ जागा रिक्त, उऱलेले ४ मेमध्ये होणार निवृत्त
ओपीडीची वेळ वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढली २१ ते २५ हजार (दिव्यांग) वेतन असणाऱ्यांना या रुग्णालयाचा लाभ मिळतो. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी भोसले म्हणाले की, वर्षभरापूर्वी नऊ ते एक वाजेपर्यत असणारी ओपीडीची (बाह्य रुग्ण तपासणी) वेळ आता नऊ ते साडेचार केली आहे. तसेच त्वचा, मानसिक आजार, आयुर्वेदासह इतर उपचार सुरू केल्यानेही रुग्णसंख्या वाढली आहे. सध्या नऊ रुग्णालयाशी करार आहे. वर्षभरात ९७ हजार जणांवर उपचार झाले. रिक्त जागांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.