आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थेचा उपक्रम:ऑरिक येथे ऑटो टेस्टिंग हब प्रकल्प स्थापन करा ; सीएमआयएचा पाठपुरावा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर महिन्यात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन (एआरएआय) संस्थेद्वारे एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ७०० एकर जमिनीसाठी निविदा मागवल्या होत्या. ऑटोमोबाइल टेस्टिंग हबसह इतर प्रकल्प या जागेत विकसित करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प ऑरिक - बिडकीन येथे करण्यात यावा, यासाठी सीएमआयएमार्फत पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच एआरएआय संचालकांना पत्र पाठवण्यात आले. ऑरिकने याविषयी सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यांच्या संचालक मंडळ आणि एआरएआय यांच्यामध्ये पुणे येथे सविस्तर बैठकही झाली असल्याची माहिती सीएमआयएचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली.

ऑरिकमध्ये हा प्रकल्प आल्यास वाहन क्षेत्रातील सर्व कंपन्या चाचणी आणि प्रमाणन करण्यासाठी येतील. याचा फायदा औरंगाबाद विभागातील ऑटोमोबाइल क्षेत्राला होईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.याबाबत मानद सचिव अर्पित सावे म्हणाले की, या संस्थेचा प्रकल्प पुण्यापासून ३०० किमी अंतरावर साधारण ६०० ते ७०० एकर औद्योगिक क्षेत्रात आयताकृती जागेत ३.३ किमी लांबीच्या आणि ८०० मीटर रुंद जागेच्या शोधात आहे. या संपूर्ण अपेक्षा ऑरिक पूर्ण करत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ऑरिकचा विचार करावा यासाठी सीएमआयए वारंवार पाठपुरावा करत आहे. नव्याने होत असलेला औरंगाबाद-पुणे एक्स्प्रेस वे बिडकीन औद्योगिक वसाहतीजवळून जात आहे.

अवजड वाहनांसाठी सुविधा द्या पुण्याच्या आसपास ३०० किमीच्या आत अंतरावर, शक्यतो औद्योगिक क्षेत्रात सुलभ रस्त्यासह, अवजड व्यावसायिक वाहनांसाठी सुविधा उपलब्ध असाव्यात. वीज केंद्र जवळ, औद्योगिक पाणीपुरवठ्याची तरतूद आदी सुविधा असाव्यात.

बातम्या आणखी आहेत...