आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वधू-वर परिचय मेळावा नुकताच यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला. या वेळी कोविडमध्ये पालक गमावलेल्या ऋतुजा मांडे हिच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी भारत चौधरी पिशोरकर यांनी उचलली.या समाजातील गरजवंताला शिक्षण, उपचार व उद्योग- व्यवसायासाठी मदत करण्याच्या उद्देशाने जय संताजी सेवाभावी संस्थेची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या कार्यक्रमात औरंगाबाद, नांदेड, बीड, जालना, परभणी जिल्ह्यांतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच वधू-वर मेळाव्यात ५५० जणांनी सहभाग नोंदवला. संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. याच कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते कचरू वेळंजकर यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.