आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद, नगरपालिका, मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पुण्यात शिक्षण समृद्धी केंद्र स्थापन केले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विषयानुसार मूल्यांकन केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.काेराेनामुळे गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यातील काही पुरेशा नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वर्ग, वय आणि स्पर्धेनुसार गुणवत्ता वाढ व्हावी. यासाठी शिक्षण समृद्धी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
यामुळे राज्यभरातील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना करण्यात येतील. औरंगाबाद जिल्ह्यात २१३० शाळा आहेत. त्यामुळे सुमारे आठ ते दहा लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशांकात राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्य शासनाने २०२२-२०२३ शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीचे वर्ष जाहीर केले आहे. यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळांचा समावेश केला आहे. राज्यभरात सध्या एक लाखाहून अधिक शाळा असून त्यात १९ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आहे.
विद्यार्थी विकासातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून विद्यार्थी विकास आणि त्यांच्या गुणवत्ता वाढीत अडसर ठरणाऱ्या त्रुटी दूर होतील. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिल्हा, तालुका, गावपातळीवरील शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची विषयानुसार गुणवत्ता तपासणार आहे. त्यातून कोणता जिल्हा, तालुका, गावातील शाळांचे विद्यार्थी अभ्यासात कमी आहेत. हे त्या केंद्रातील ऑनलाइन प्रणालीवर दिसेल. -एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.