आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व जिल्हा रुग्णालयात दहा खाटा राखीव‎:मनोरुग्णांसाठी राज्यातील आठ‎ शहरात आढावा मंडळे स्थापन‎

छत्रपती संभाजीनगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानसिक रुग्णांसाठी राज्यातील‎ प्रत्येक जिल्हास्तरीय रुग्णालयात दहा ‎ ‎ खाटा राखीव ठेवण्याचे आदेश‎ देण्यात आले आहेत. राज्यातील ८ ‎ ‎ शहरात आढावा मंडळे स्थापन झाली ‎ ‎ आहेत, असा दावा सार्वजनिक ‎ ‎ आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांनी ‎ ‎ केला आहे.‎ नुकत्याच झालेल्या जागतिक‎ आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक‎ रुग्णांवरील उपचारांची काय स्थिती‎ आहे. सरकार त्यांच्याकडे कितपत‎ गांभीर्याने बघते, याची माहिती‎ घेण्याचा प्रयत्न दिव्य मराठीने केला.‎ मार्चमधील विधी मंडळ‎ अधिवेशनात हा विषय होता असे‎ लक्षात आल्यावर शोध घेतला. तेव्हा‎ असे समोर आले की, विधान‎ परिषदेत डाॅ. प्रज्ञा सातव यांनी‎ राज्यातील मनोरुग्णालयांमधील‎ अनेक रुग्णांकडे दुर्लक्ष होत‎ असल्याचे जानेवारी २०२३ मध्ये‎ निदर्शनास आले. हे खरे आहे काय,‎ असा प्रश्न विचारला होता.

त्यावरील‎ लेखी उत्तरात डाॅ. सावंत यांनी म्हटले‎ आहे की, ठाणे, पुणे, रत्नागिरी व‎ नागपूर येथे पूर्ण क्षमतेची प्रादेशिक‎ मनोरुग्णालये आहेत. सध्या‎ आंबेजोगाई (जि. बीड) येथे वृद्धत्व‎ आरोग्य व मानसिक आजार केंद्र‎ कार्यान्वित करण्यात आले आहे.‎ ‎ ‎ ‎‎ ‎ जालना जिल्ह्यात ३६५ खाटांचे‎ प्रादेशिक मनोरुग्णालय मंजूर‎ करण्यात आले असून ३४‎ जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये‎ प्रत्येकी १० खाटा मनोरुग्णांसाठी‎ राखीव आहेत. सातव यांनी प्रश्नात‎ असेही म्हटले होते की, राज्य‎ सरकार मनोरुग्णांच्या स्थितीचे‎ पुनरावलोकन करण्यास तयार नाही.‎ सातव यांच्या या आरोप तथ्य नाही,‎ असा सूर डॉ. सावंत यांनी लावला‎ आहे.‎

५३ समुपदेशक, ६००० काॅल‎ ठाणे, पुणे, अंबेजोगाई येथे १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर समुपदेशानासाठी‎ दीड वर्षांत ६००० कॉल प्राप्त झाले आहे. ५३ कंत्राटी स्वरुपात नियुक्त केलेल्या‎ ५३ समुपदेशकांनी या काॅल करणाऱ्यांशी संवाद साधला. १५ नोव्हेंबर २०२१‎ रोजीची अधिसुचना आणि मानसिक आरोग्य अधिनियम, खंड ७३ व ७४‎ नुसार पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, औरंगाबाद व लातूर‎ येथे मानसिक आरोग्य आढावा मंडळ स्थापन केले आहे.‎