आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांनी केले उद्घाटन:शिंदे गटाची पहिली शाखा स्थापन; शहरप्रमुखपदी विश्वनाथ राजपूत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य मतदारसंघातील खडकेश्वर भागात शिंदेसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन रविवारी झाले. याच वेळी पालकमंत्री संदिपान भुमरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनी विश्वनाथ राजपूत यांची मध्यचे शहरप्रमुख म्हणून निवड केली. यापूर्वी मराठवाड्यात शिवसेनेची सुरुवातदेखील मध्य मतदारसंघातील याच भागातून झाली हाेती. काही दिवसांपूर्वी उद्धवसेना सोडून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या राजपूत यांची शहरप्रमुखपदाची घोषणा करण्यात आली. यापूर्वी त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...