आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘फ्रेंड्स आॅफ बीजेपी’ मेळाव्यात जालना ते मुंबई सीएसटी जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याची एकमुखी मागणी करण्यात आली होती. ही भावना लक्षात घेऊन या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेळाव्यात दिले होते. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर या एक्स्प्रेसची वेळ पूर्ववत होईल अशी अपेक्षा असताना कुठलाच बदल झाला नसल्याने भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या शब्दाला किंमत नाही का, अशी चर्चा रंगली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत स्व. भानुदास चव्हाण सभागृहात फ्रेंड्स ऑफ बीजेपी मेळाव्याचे आयोजन १५ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. शहरातील सर्व घटकांमधील प्रमुख पदाधिकारी, विविध संस्था-संघटनांचे सदस्य उपस्थित होते. मेळाव्यात जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ पूर्वीप्रमाणे सकाळी ६ वाजता करावी, अशी मागणी करण्यात आली होती. तेव्हा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जनभावनेचा आदर केला जाईल, नागरिकांच्या मागण्यांना भाजप नेहमीच प्राधान्य देत आला आहे अशी पुष्टी जोडली होती. केंद्रीय बजेटनंतर वेळेसंबंधी निर्णय होईल अशी अपेक्षा शहरवासीयांना होती, परंतु ती फोल ठरली.
पूर्वीची वेळ सर्वांना होती सोयीची जनशताब्दी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी ६ वाजता निघून दुपारी १२.३० वाजता मुंबई येथे पोहोचत असे. यामुळे नागरिकांना मुंबईला जाऊन एका दिवसात आपले काम आटोपून परतणे शक्य होत होते. नंतर नंदीग्राम, राज्यराणी अथवा देवगिरी एक्स्प्रेसने परतणे शक्य होते. नवीन वेळापत्रकानुसार ती सकाळी ९.३० वाजता निघून दुपारी ४.३० वाजता सीएसटीला पोहोचते. त्यामुळे मुंबईत मुक्कामाशिवाय पर्याय नसतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.