आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागल्लीबोळातील प्ले-स्कूल, प्री-प्रायमरी, केजी, नर्सरी शाळांवर अातापर्यंत कुणाचेही नियंत्रण नव्हते. मात्र, आता यापुढे अशा शाळा मनमानी पद्धतीने चालवता येणार नाहीत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार या शाळा सुरू करताना शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार असून या सर्व शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण राहणार आहे. निपुण वर्ग, शाळा, क्षमता याअंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या एकूण २२०० हून अधिक शाळा आहेत, तर खासगी शाळांची संख्यादेखील हजारच्या जवळपास आहेत. अंगणवाड्या असतानादेखील गल्लीबोळांमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, बालवर्ग, केजी आदी वर्ग सुरू आहेत. आता तर अंगणवाड्यादेखील प्राथमिक शाळा सुरूवात करत आहेत.
गल्लीबोळातील शाळांकडून पालकांची दिशाभूल होणार नाही
आजवर मोठ्या प्रमाणात खासगी पद्धतीने नर्सरी, केजी, प्ले ग्रुप या वर्गांच्या शाळा चालवल्या आहेत. मात्र आता परवानगी घेणे बंधनकारक अाहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांना वय-मानसिक विकासानुसार शिक्षण द्यावे लागेल. -जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी
प्री-प्रायमरीवर खरेच कुणाच नियंत्रण नव्हते. त्यामुळे मनमानी होती. शासनाचा आणि शिक्षण विभागाचा निर्णय योग्य आहे. यामुळे गल्लीबोळातील शाळांकडून दिशाभूल होणार नाही. पालकांना त्रास होणार नाही. -प्रल्हाद शिंदे, मेसा संघटना संस्थापक अध्यक्ष
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.