आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाकडे डोळे:धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले नाही तरी नेत्यामुळे निवडणुका जिंकू, दोन्ही गटांतील सामान्य कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

३० जून रोजी महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेनेत दुफळी झाली. एकनाथ शिंदे आणि उद्धव सेनेमध्ये निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली. धनुष्यबाण कुणाचा, याविषयी माध्यमांमध्ये वृत्तमालिका चालवल्या जात आहेत. धनुष्यबाणावरच आगामी निवडणुकीत जय-पराजय अवलंबून असेल, असे चित्र रंगवले जात आहे. दोन्ही गटांचे नेते तशा स्वरूपाची वक्तव्येही करत आहेत. पण स्थानिक पातळीवर शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना नेमके काय वाटते, त्यांच्यासाठी धनुष्यबाण किती महत्त्वाचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न दिव्य मराठी प्रतिनिधीने केला. तेव्हा शिंदेसेना, उद्धवसेना पदाधिकाऱ्यांनी असा दावा केला की, धनुष्यबाण आमचाच आहे. तो न्यायालय आम्हाला देईलच. पण तसे झाले नाही तरी आमचे नेते खंबीर आहेत. त्यांच्या बळावर आम्ही निवडणुका जिंकू.

चिन्हापेक्षा उद्धव ठाकरेंवर विश्वास : २०१०मध्ये शिवसेनेकडून अपेक्षित वाॅर्डात उमेदवारी मिळाली नाही. म्हणून माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी कबीरनगर वाॅर्डातून अपक्ष निवडणूक लढली आणि त्या विजयी होऊन महापौरही झाल्या. तो संदर्भ न देता घोडेले म्हणाले की, धनुष्यबाण हे चिन्ह खऱ्या शिवसेनेचे आहे. शिवसेनेच्या घटनेतही हाच उल्लेख आहे. त्यामुळे दुसऱ्यांकडे चिन्ह जाऊच शकत नाही. मात्र सध्या जी धाकदडपशाही सुरू आहे, त्यामुळे कदाचित दगाफटका झाला तर आम्हाला काहीही फरक पडत नाही. कारण जनतेचा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. त्यांच्या नेतृत्वातच आम्हाला विजय मिळेल.

शिंदेसेना, उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा चिन्हापेक्षा पक्षावरील विश्वास मोठा - आमचा धनुष्यबाण जावूच शकत नाही. मात्र, विपरित घडलेच तर चिन्हापेक्षा जनतेचा विश्वास शिवसैनिकांवर आहे. उद्धव ठाकरेंचा शब्द सगळ्यांसाठी प्रमाण आहे. जनतेचा आमच्यावरील विश्वास सिद्ध करण्यासाठी आम्ही अजून जोमाने कामाला लागू, असे उद्धव गटाचे महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी सांगितले.

चिन्ह गोठवल्याने फरक पडणार नाही -आता धनुष्यबाण शिंदे गटाकडेच असेल. कदाचित ते गोठवले तरी फरक पडणार नाही. कारण आमचे नेते एकनाथ शिंदे खंबीर, दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत. त्यामुळे जनता आमच्याकडेच असेल, असे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले.

एकनाथ शिंदे हीच आमची शक्ती -धनुष्यबाण आमच्याकडेच राहील यात शंका नाही. मात्र ते गोठवले गेले तर आमचे काम, शिंदेंसारखे कर्तबगार मुख्यमंत्री हीच आमची शक्ती राहणार आहे. शिल्पाराणी वाडकर, माजी नगरसेवक, शिंदे गट

बातम्या आणखी आहेत...