आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:अश्रूदेखील लिंबूपाण्यासारखे आंबट-गोड असू शकतात!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी मी एका लग्नाला गेलो होतो. मला पाहुण्यांच्या यादीत माझे नाव दोन आठवड्यांपूर्वीच शेवटी घेतले असेल हे माहीत होते. मी १५ दिवसांपूर्वी पाहिलेला एक ओळखीचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करत होतो, त्यानंतर शेजारच्या बेडरूममध्ये दोन दशकांहून अधिक काळ रोज पाहिलेला चेहरा दिसला. तिच्या कुटुंबात हे लग्न होते. आमची नजरानजर झाली. मला वाटले की, ती धावत येऊन मला मिठी मारेल, कारण मी अनेक वर्षे तिचा हीरो होतो. मी तिच्या नखांवर तिच्या आवडीचे रंग अनेक वेळा लावले. इतकेच नाही, तर तिला आवडणाऱ्या सर्व गोष्टीही आणून दिल्या. तिचे बूट पॉलिश करत असे. तिचे कपडे इस्त्री करत असे. मी तिला खायला घातले, तिच्याबरोबर खेळलो, ती खूप आजारी पडली तेव्हा माझे संपूर्ण ऑफिस कामाला लावले होते. तिला रामेश्वरमला पूजेसाठी घेऊन गेलो, कारण तिला काही ग्रहदोष असल्याचे पंडितांनी मला सांगितले होते. ही यादी न संपणारी आहे. माझा तिच्यावर जीव होता. ती मला पाहताच धावत येणार, हे मला माहीत होते. आमची नजरानजर झाली व ती काही बोलणार, तेवढ्यात कोणी तरी तिच्या खांद्यावर थाप दिली, तिची नजर माझ्याकडे होती, पण कान दुसरीकडे वळले. ती या महिलेला फक्त तीन आठवड्यांपासून ओळखत होती, तरीही ती तिच्यासोबत गेली. तिने डोके हलवून डोळ्यांनी माफी मागितली. माझे डोळे म्हणाले, ‘काही हरकत नाही.’

मनात संमिश्र भावना येत होत्या. एकीकडे मनाला आनंद झाला की, दोन आठवड्यांपूर्वी ती सून म्हणून तिच्या जबाबदाऱ्या इतक्या सहजतेने पार पाडत होती. पण, मन खूप स्वार्थी आहे. ते जड झाले, डोळे ओले झाले. दहा मिनिटे डोळे तिचा पाठलाग करू लागले. ती बोलत होती, हसत होती, आरती करत होती, कारण तिला तसे करायला सांगितले होते. तिने माझ्याकडे पाहिले नाही, पण मी तिच्यावरून नजर हटवू शकलो नाही. अचानक तिची आई भेटली. दोन आठवड्यांनी भेटत असल्याने दोघींनीही एकमेकींना घट्ट मिठी मारली. साडी अधिक चांगली नेसण्याचे परिचित धडे आईने शिकवायला सुरुवात केली. मग सेल्फी घेतली. त्याच वेळी तिची सासूही तिथे आली. ती माझ्या दिशेने पाहत म्हणाली, बाबा, कृपया इथे या आणि आमचा फोटो काढा. माझ्या शेजारी बसलेले तिचे वडील हळूच उठले आणि तिच्याकडे फोटो काढायला गेले. हे सर्व मी दुरूनच पाहत होतो.

फ्रेममध्ये ती सासूकडे अधिक झुकत होती आणि तिची सासूही खूप प्रेमाचा वर्षाव करत होती. पण, तिने आईलाही घट्ट पकडून ठेवले, जणू काही मला तुझीही गरज आहे, असे ती सांगत असावी. दोन आठवड्यांपूर्वी लग्न झालेल्या तिच्याकडून काही मुत्सद्दीपणा शिकता आला. मग ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, पापा. मी तिला एका खांद्याकडून मिठी मारत असतानाच दुसऱ्या आवाजाने मला पापा म्हटले आणि दुसऱ्या खांद्याला मिठी मारली. तो माझा मुलगा व तिचा खरा हीरो असल्याचे मला कळले. आता मला दोन मुले असल्याचे जाणवून माझे मन आनंदाने भरून आले. घरी परतलो तेव्हा शेजारची बेडरूम अजून रिकामीच होती. पण, मला दुःख झाले नाही, कारण येत्या काही दिवसांत हे घरटे छोट्या पाहुण्यांनी भरून जाणार हे मला माहीत होते. माझ्यातला वेडा बाप खोलीत गेला आणि ती अशी आवरू लागला, जणू आजच छोटे पाहुणे येत असावेत. बाप नेहमी वेडा असतो.

बातम्या आणखी आहेत...