आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारात्री जेवण करून झोपलेली मुले दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत उठली नाहीत. वडिलांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घरी धाव घेत मुलांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अदिबा फहाद बसरावी (६) आणि अली फहाद बसरावी (४) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना सादातनगरात सोमवारी उघडकीस आली.
सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहाद बसरावी हे सादातनगर येथील गल्ली नंबर ३ मध्ये पत्नी आणि दोन मुलांसह आपल्या भावांसोबत एकाच इमारतीत राहतात. म्हाडा कॉलनीत त्यांचे किराणा दुकान आहे. सोमवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी गेले. दुपारी १२ वाजता मुलांना शाळेत नेण्यासाठी गाडी आली तेव्हा मुले उठली नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे मुलांची आई घरीच होती. ही माहिती मिळताच वडील तत्काळ घरी आले. त्यांनी दोन्ही मुलांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी मुलांना घाटीत नेण्याचा सल्ला दिला. घाटीत पाेहाेचल्यानंतर डॉक्टरांनी दोन्ही मुलांना तपासून मृत घोषित केले. सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी या प्रकरणात नागरिकांशी चर्चा केली. यानंतर या दोन्ही मुलांचे शवविच्छेदन करण्यात आले.
चौकशीसाठी काही संशयित ताब्यात शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल. सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.