आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:प्रत्येक व्यवसायाने सभोवतालच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले पाहिजे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा हे वर्षानुवर्षे परदेशी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. तेथील वालुकामय समुद्रकिनारे व चमकदार सूर्यप्रकाश पर्यटकांना आकर्षित करतो. ब्रिटन-रशियाच्या पर्यटक येथे भरमसाट होते, पण गोव्यातील पर्यटन उद्योगातील व्यावसायिक देशी पर्यटकांऐवजी त्यांच्यासाठी वेळ काढत होते. तरीही पर्यटकांच्या सोयी-सुविधांबाबतच्या छोट्या-छोट्या प्रश्नांकडे ते लक्ष देऊ शकले नाहीत. पर्यटन स्थळांवर भिकारी, मद्यपी, ठरवून दिलेल्या झोनबाहेर वॉटर स्पोर्ट््स करणारे, उघड्यावर कचरा टाकणारे व समुद्रकिनाऱ्यांसह अन्य पर्यटन स्थळांवरील फेरीवाल्यांबद्दलच्या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

त्यामुळे पर्यटकांना फसवणूक झाल्याचे जाणवले. ते सोशल मीडियावर गोव्याच्या पर्यटनावर खुलेआम टीका करू लागले, त्यामुळे पर्यटन उद्योगाचे बरेच नुकसान झाले. अखेर राज्य सरकारने दबावात येऊन दिवाळीनंतर कारवाईचा निर्णय घेतला. गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खुंटे यांनी आता लोकांना त्रास देणाऱ्यांना दंड ठोठावला जाईल, दंड न भरल्यास पोलिस पकडतील, असे सांगितले. पोलंड, द. कोरिया, जपान, अमेरिका यांसारख्या नवीन बाजारपेठांमधून पर्यटकांना आकर्षित करण्याची योजनाही मंत्र्यांनी आखली. गोव्यापासून धडा घेत महाराष्ट्रानेही समुद्रकिनाऱ्यांवर पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. गोव्याला नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करून विविध ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी सुधारायची आहे. सिंगापूरला भेट देऊन पर्यटन विभाग गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचा प्रचार करण्याची ही पहिलीच वेळ आहे! देशांतर्गत पर्यटकांवरही लक्ष आहे. या घटनेतून आपण शिकतो ते धडे असे :

१. सर्व काही एकाच मार्केटमध्ये लावू नका. गोवा पूर्णपणे ब्रिटन-रशियाच्या पर्यटकांवर अवलंबून होता. देशांतर्गत पर्यटकांकडे दुर्लक्ष झाले. पण, कोविडच्या २ वर्षांत या देशी पर्यटकांनी गोव्यातील पर्यटन उद्योगाला तारले. २. ग्राहकांची कोणतीही तक्रार सोशल मीडियावर असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका. सोशल मीडिया काही सेकंदांत संपूर्ण जगापर्यंत काहीही पोहोचवू शकतो. त्यामुळे प्रत्येक तक्रार गांभीर्याने घ्या व तिचे त्वरित निराकरण करा, कारण त्याचे आंतरराष्ट्रीय दुष्परिणाम होऊ शकतात. ३. व्यवसाय चालवत असाल तर अडचणी येतीलच. गोव्याचे किनारे जणू कचराकुंडी होऊन फुटलेल्या बिअरच्या बाटल्या अनवाणी चालणाऱ्यांना जखमी करत असत. आता सुरक्षेसाठी रिकाम्या बाटल्या विक्रेत्यांमार्फत जमा करण्याच्या पद्धतीवर सरकार विचार करत आहे. त्यामुळेच पर्यटन मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पर्यटकांना सुरक्षा देण्यासाठी सर्व विभागांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली. ४. आपला कुणीही प्रतिस्पर्धी नाही, असा विचार कधीही विचार करू नका. देवाच्या कृपेने नैसर्गिक सौंदर्य मिळाले असेल तर कोणीही प्रतिस्पर्धी मैदानात उतरणार नाही, असा अतिआत्मविश्वास बाळगू नका. ते कुठूनही येऊ शकतात. ५. प्रतिस्पर्ध्यांवरही लक्ष ठेवा. आपल्याला कोणीही हरवू शकत नाही, असा विचार करू नका. आज आपण ज्या पेनने लिहितो त्याचा शोध वॉटरमनने लावला. सुरुवातीला त्यांचा पेन १० हजार रुपयांपेक्षा कमी नव्हती. पण, नंतर आलेल्या रेनॉल्ड्सने अधिक पैसे कमावले, कारण त्याने किंमत एक रुपयापर्यंत कमी केली.

फंडा असा ः कोणताही व्यवसाय करत असाल तर सावध राहा, चौफेर नजर ठेवा, कारण आव्हान कुठूनही येऊ शकते.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...