आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्तपणा:प्रत्येक चाैथा औरंगाबादकर माेडताेय नियम; 27 कोटींचा दंड; वसुली अवघी 5.71 कोटी

औरंगाबाद / सुमीत डोळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यावर उभ्या वाहतूक पोलिसांची भीती आता वाहनचालकांमध्ये दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे चित्र वर्षअखेर समोर आलेल्या कारवायांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. वर्षभरात वाहतूक नियम माेडणाऱ्या ३ लाख ९२ हजार ६०१ वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. म्हणजेच प्रत्येकी चाैथा औरंगाबादकर वाहतुकीचे नियम माेडताेय. त्यांना २६ कोटी ९५ लाख ३४ हजार ४५० रुपये दंड ठोठावला. मात्र, अपुरे संख्याबळ व ऑनलाइन पेड-अनपेडच्या पर्यायामुळे फक्त १ लाख ७ हजार ६१४ वाहनचालकांनी ५ कोटी ७१ लाख २२ हजार ६५० रुपयांचा दंड भरला. वर्षभरात फक्त ३१ डिसेंबरच्या रात्री एकूण आठ मद्यपींवर कारवाई झाली. शहरात गेल्या दोन वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरटीओच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०२२ पर्यंत वाहनांची एकूण संख्या १७ लाख झाली आहे.

परंतु त्या तुलनेत वाहतूक पाेलिस नाहीत. लहान व खड्डेमय रस्ते, सदाेष सिग्नल व प्रामुख्याने बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान वाहतूक पोलिसांनी तब्बल ३ लाख ९२ हजार ६०१ वाहनचालकांवर कारवाई करत २६ कोटी ९५ लाख ३४ हजार ४५० रुपयांचा दंड ठोठावला. गेल्या काही वर्षांपासून वाहनचालकांना ऑनलाइन दंड पाठवण्यास सुरुवात झाली. परंतु ऑनलाइन दंडाची परिणामकारक वसुली हाेत नाही. त्यामुळे केवळ १ लाख सात हजार ६१४ वाहनचालकांनी ५ कोटी ७१ लाख २२ हजार ६५० रुपये दंड भरला. २ लाख ८४ हजार ९९० वाहनचालकांनी २१ कोटी २ लाख ११ हजार ८०० रुपये दंडच भरला नाही.

इशाऱ्यानंतरही १.९ लाख लोक थांबलेच नाहीत २१ विविध प्रकारांमध्ये हा दंड आकारला जातो. पोलिसांनी इशारा करूनही न थांबल्यास कलम २३९/१७७ व १७९/१७७ अंतर्गत कारवाई होते. अशा १.९ लाख वाहनचालकांना ७८ लाख ४९ हजार ५०० रुपये व ५ कोटी ७६ लाख ४६ हजार ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला.

५७ हजार दुचाकीस्वार विनाहेल्मेट आढळले विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५७ हजार ५७९ जणांकडून २ काेटी ८७ लाख ६७ हजार दंड वसूल केला, तर फॅन्सी व अस्पष्ट नंबर प्लेट असलेल्या २६ हजार ३४७ वाहनचालकांकडून १ काेटी ६० लाख २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...