आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:दररोज रात्री लाईट जाते, वस्तीतील मुलं लाकडी काठी घेऊन हातानेच फ्युज टाकतात

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वास्तव

तालुक्यातील लिंबागणेश येथील आण्णाभाऊ साठे नगर येथे दररोज रात्री लाईट जाते, वस्तीतील मुलं लाकडी काठी घेऊन हातानेच फ्युज टाकण्याचा प्रयत्न करतात. हातात ग्लोव्हज विद्युत रोधक नसतात,जीव मुठीत घेऊन फ्युज टाकतात. हा प्रकार जीव घेणे ठरू शकतो परंतु गावात वीज कर्मचारी लक्ष देत नसल्याने ही वेळ तरुणांवर आली आहे.

सध्या पाऊस पडत आहे, त्यामुळे ट्रान्सफाॅर्मर भोवतालची जमिन ओली झाली आहे. विद्युत प्रवाह सुरू करताना जीवाला धोखा होण्याचे प्रमाण जास्तच वाढले आहे. लाईनमन शेळके यांना मी स्वतः फोनवरून विचारणा केली असता, फ्युज टाकून लाईट चालु करतो म्हणाले....ग्रामीण भागात बहुतेक ठीकाणी ट्रान्सफाॅर्मर सताड उघडे असतात, बंदिस्त दरवाजे नसतात,पाऊस पडल्यामुळे आसपास उगवलेल्या गवतांना चरण्यासाठी आलेल्या जनावरांचाही जीव धोक्यात असतो.

सक्तीने विजबिल वसुल करणारे महावितरणचे कर्मचारी सेवा कधी देणार: मध्यंतरी विजबिल रझाकारी पद्धतीने वसुल करणारे महावितरणचे कर्मचारी ग्रामस्थांना सेवा देताना तत्पर वाटत नाहीत, विजबिल भरल्याशिवाय तोडलेली विज जोडणी करणार नाही म्हणणारे मात्र सेवा देताना फारसे तत्पर दिसून येत नाहीत. बहुतेक करून महावितरणचे कर्मचारी विशेषतः लाईनमन मुख्यालयी रहातच नाहीत. डाॅ.गणेश ढवळे , सामाजिक कार्यकर्ते ,लिंबागणेश,जिल्हा बीड

बातम्या आणखी आहेत...