आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Every Year 100 Students Get Employment, Opportunities In Industry. Bhu. Science College MoU With Companies; Train The Trainer Concept Will Be Implemented

दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना रोजगार, उद्योगात संधी:स. भु. विज्ञान महाविद्यालयाचा कंपन्यांशी सामंजस्य करार; राबविणार ट्रेन द ट्रेनर संकल्पना

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी रेड हॅट, ,ईसी मोबिलिटी, मॅजिक, एक्सपर्ट ग्लोबल सल्युशन,बी. वाय. एस. टी, पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारा अंतर्गत शैक्षणिक संस्था आणि उद्योग संस्था यामुळे दरवर्षी बीएससी, बीसीएस, एमएस्सीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह, नोकरीच्या तसेच नवउद्योजक घडवण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. अशी माहिती उपप्राचार्य दीपक कायंदे यांनी दिली.

शुक्रवारी संस्थेच्या पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात पार पडला. यावेळी मॅजिकचे संचालक आशिष गर्दे, रेड हॅटचे आशितोष भाकरे, एसीईचे सुशील संवत्सर,एक्सपर्ट ग्लोबल सल्युशनचे प्रशांत देशपांडे, विशाल जाधव, बीवायएसटीचे अजित खोजरे, प्राचार्य डॉ. अनिल शंकरवार, डॉ. क्षमा खोब्रागडे, प्रा. दीपक कायंदे, प्रा. अमोल झाल्टे, प्रा. गजानन सानप, मिलिंद रानडे, नॅसकॉमचे सचिन म्हस्के, देवगिरी कंस्ट्रक्शनचे सचिन सांबरे, शिरीष कुललकर्णी यांची उपस्थिती होती.

गर्दे यांनी सांगितले की, आजवर तांत्रिक शिक्षण घेणारेच उद्योजक होतात. असा समज होता. परंतु आता तसे राहिलेले नाही. कला, वाणिज्य,विज्ञान अथवा इतर क्षेत्रातीलही उद्योजक होवू शकतात. उद्योजक घडवणे हा मुख्य उद्देश या करारा मागे असून, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राचा संवाद अधिक होणे गरजेचे आहे. नवीन युवा पिढी नोकरीच्या शोधात जाण्यापेक्षा नोकरी देणारी व्हावी. अशी संकल्पना राबवित आहोत.ज्यात विद्यार्थ्यांच्या चांगल्या संकल्पना, नाविण्यता ते संशोधनातून पुढे आणतील. त्याला शाश्वत व्यवसायात रुपांतर करण्यासाठी आम्ही मदत करु. आज उद्योग क्षेत्रात समस्येवर उपाय शोधणे अशी कल्पना देणारे, उद्योगांची व्यापती वाढविणे, त्यातून ही कल्पना, आयडिया व्यवसायात टिकली पाहिजे, रोजगार त्यातून किती जणांना मिळू शकतो. देशाच्या विकासासाठी अधिकाधिक आपल्या व्यवसायातून करदाते देखील निर्माण व्हावेत. रोजगार मिळवणाऱ्यांबरोबरच रोजगार देणारे व्हावेत असा मॅजिकिचा उद्देश असल्याचे गर्दे यांनी सांगितले.

देशपांडे यांनी सांगितले की, या करारा अंतर्गत आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देवून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. आज उद्योग क्षेत्रात खूप संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी तरुणांनी संवाद कौशल्य, सामाजिक, सामान्य ज्ञान वाढविणे आवश्यक आहे. तसेच आपण जे शिक्षण घेतले आहे. त्याचा प्रत्यक्ष कामात उपयोग कसा होईल हे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यातच मुले कमी पडतात. यावर अधिक काम करण्याची गरज असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

प्रा. कायंदे म्हणाले, दरवर्षी अंतिम वर्षात शिकणाऱ्या बीएससी, बीसीएस आणि एमएस्सीच्या विद्यार्थ्यांना या करारा अंतर्गत प्रशिक्षण तसेच रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. तीन वर्षांसाठीचा हा करार आहे. यात आठ ते दहा आठवडे मुलांना प्रशिक्षण देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...