आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केल्याचा ढिंडोरा आजी-माजी सरकारकडून पिटवला गेला. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याच सरकारकडून अधिकृत राजपत्र, परिपत्रक किंवा शासन निर्णय प्राप्त झालेले नाही. त्यामुळे औरंगाबाद हे औरंगाबादच आहे, त्याचे नामांतर अजूनही झालेले नाही याबाबत स्पष्ट निर्वाळा जिल्हाधिकाऱ्यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पत्राद्वारे दिला. याबाबत माजी आमदार जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणापासून ते औरंगाबाद नामांत्तराबाबत शिवप्रेमींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम हे काही राजकीय पुढाऱ्यायांनी, पक्षांनी केले आहे. सत्तेत येऊन सहा महिने होत आले अद्यापही साधे राजपत्रदेखील काढले नाही. शिवरायांबद्दल खोटं बोलणं योग्य नाही. श्रीपाद छिंदमपासून कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, रावसाहेब दानवे, आता चंद्रकांत पाटील हे भाजपचे नेते इतिहास खोडायचे प्रयत्न करताहेत. औरंगाबादचे संभाजीनगर करतो असे म्हणत हिंदुत्वाच्या नावाखाली हे आयुष्यभर जगले. त्यांनी संभाजीनगरचे राजपत्र काढले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.