आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:माजी महापौर सोनवणेंची दारू दुकानदारास मारहाण

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शासकीय नियम काहीही असो, माझ्या एरियात माझ्या नियमानुसार धंदा करावा लागेल’ असे धमकावत माजी महापौर सुदाम सोनवणेंसह अन्य एकाने वाइन शॉप चालकाला मारहाण करत जखमी केले. या प्रकरणी बुधवारी सोनवणेंसह त्यांचे साथीदार संदीप कांबळे व बापू देशमुखवर सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रात्री दहाच्या आत दुकान बंद करण्यावरून हा वाद झाला.

सिडको परिसरातील एमआर वाइन शॉपीत स्वप्निल गुंजाळ (२८) काम करतो. २१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजून २६ मिनिटांनी त्यांच्या दुकानात अचानक सोनवणे, कांबळे, देशमुख यांनी प्रवेश केला. कंबरेचा बेल्ट काढून त्यांनी गुंजाळ यास मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘दहा वाजेच्या आत दुकान बंद झाले पाहिजे. हा माझा एरिया आहे. काय पोलिस तक्रार करायची ती कर, पोलिस काय करतात ते मी पाहून घेईल.

नसता तुम्हाला सर्वांना मारून टाकीन’ अशी धमकी देत सोनवणे यांनी गुंजाळला लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. शासकीय वेळ काहीही असो, माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर माझ्या नियमानुसार करावा लागेल, असे धमकावत त्याला रक्तबंबाळ केले. गुंजाळ यांच्या कानाला गंभीर दुखापत होऊन ऐकू येणेदेखील बंद झाले.

बातम्या आणखी आहेत...