आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर आता पुन्‍हा सेनेत वापसी:मीनाताई स्मृती सोहळ्यात माजी महापौरांचा उद्धव गटात प्रवेश निश्चित

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीस वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडलेले माजी महापौर सुदाम सोनवणे गेल्या उद्धव गटात प्रवेश करणार अशी दोन आठवड्यांपासून चर्चा होती. काही स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांचा प्रवेश लांबल्याचेही म्हटले जात होते. पण मंगळवारी गुलमंडीवर मीनाताई ठाकरे स्मृती अभिवादन सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. तेव्हा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या भक्कम भूमिकेमुळे त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे दिसले.

सोनवणे यांनी त्यांच्या खास शैलीत माजी आमदार, महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्याशी संवाद साधला. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात मीनाताईंना अभिवादन केल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...