आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी सैनिकही आघाडीवर; 10 हजार माजी सैनिकांची प्रशासन घेणार मदत 

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बारामती पॅटर्नमध्येही माजी सैनिक

सतीश वैराळकर

राज्यातील ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सुमारे १० हजार निवृत्त लष्करी सैनिकांनी काेराेनाविराेधी लढाईत प्रशासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शवली अाहे. त्यांची मदत घेतली जात अाहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या काही निवृत्त सैनिक कामही करत अाहेत. अाता लष्करात वाहनचालकाचे काम केलेले ३५० माजी सैनिक काेराेनाच्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका चालवण्याच्या तयारीत अाहेत, तर वैद्यकीय विभागात काम करणारे ५० माजी सैनिक कोरोनाग्रस्तांची शुश्रूषा करतील. काेरेानाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्याने या लढ्यात काम करण्यासाठी स्वयंसेवकांची गरज अाहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अावाहनानुसार २१ हजार व्यक्तींनी यात स्वयंस्फूर्तीने काम करण्याची तयारी दर्शवली अाहे. यात माजी सैनिकही पुढे अाहेत.

राज्यात १ लाख ८० हजार माजी सैनिक आहेत. यापैकी ६० टक्के सैनिकांनी वयाची साठी अाेलांडली अाहे, तर ४० हजारांवर माजी सैनिक राज्य शासनाच्या विविध विभागांत सेवेत आहेत. ‘मेस्को’ आणि विविध विभागांत १२ हजार सुरक्षा रक्षक म्हणून काम करत अाहेत.

पुणे येथील सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, ‘या काळात माजी सैनिकांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून स्थानिक प्रशासनाच्या वतीने काम दिले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३०० माजी सैनिकांना असे काम दिले अाहे. त्यांना २० हजार रुपये वेतनही दिले जाते. ५० मेडिक्स (वैद्यकीय मदतनीस) माजी सैनिकांना शासकीय रुग्णालयात अाराेग्य कर्मचाऱ्यांसाेबत कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी तैनात केले आहे. त्यांनाही २० हजार रुपये वेतन दिले जाते. राज्यात रुग्णवाहिकेसाठी चालकांची मोठी गरज होती. सैन्यातील निवृत्त झालेले दहा हजारपैकी ३५० माजी सैनिक चालक मिळाले आहेत. अलीकडेच निवृत्त झालेले व सध्या कुठेच सेवेत नसलेल्या माजी सैनिकांचा या माेहिमेत समावेश करण्यात अाला अाहे,’ असे जाधव म्हणाले.

बारामती पॅटर्नमध्येही माजी सैनिक

पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या विनंतीवरून ३६ माजी सैनिकांना अाराेग्य सेवेत मदतीसाठी दिले आहे. पुणे जिल्ह्यात ३६ हजार ८०० माजी सैनिक असून यातील अनेकांनी मदतीसाठी होकार दर्शवला. भोर तालुक्यातून १८० माजी सैनिक पुढे आले. बारामती नगरपालिकेच्या वतीने एक नगरसेवक, एक वैद्यकीय अधिकारी, एक स्वयंसेवक, एक नगरसेवक आणि एक माजी सैनिक अशी टीम तयार केली आहे. ही टीम वैद्यकीय तपासण्या व नागरिकांचे वॉर्डनिहाय कोरोनासंंबधी प्रबोधन करते

बातम्या आणखी आहेत...