आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या जगभरात आणि देशात जागतिक महामारी असलेल्या कोरोनाचे संकट टळले नाही. पहिली, दुसरी आणि तिसरी लाट येऊन गेली. अद्यापही नवनवीन व्हेरियंट येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गात आणि महाविद्यालयात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मागील पध्दतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्या. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विधी विद्यार्थ्यांचे कुलगुरूंना निवेदन दिले.
दररोज शेकडो नवीन रुग्ण आढळत असतांना सध्या परिस्थिती डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याचे ठरविले आहे. परंतु सध्या कोरोना महाराष्ट्र राज्यात वाढत चालला आहे, आणि अश्यात परीक्षा देण्यासाठी राज्यभरातून मुंबई पुणे अशा विविध ठिकाणाहून विद्यार्थी शहरात येतील. त्याच्या सोबत कोरोना बाधित विद्यार्थी आला आणि तो इतर विद्यार्थ्याच्या संपर्कात आल्यास कोरोणा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच कोरोनाचा नवीन प्रकार आला आहे. त्याची लक्षणे कोणती आहे व तो किती गंभीर स्वरूपाचा आहे याची कुठलीच कल्पना कोणाला नाही. या पासून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संसर्ग बाधित होऊन मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा जर विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी कोण घेईल? आणि ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नाही त्यांचे काय? परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंध नियम पाळले जातील का?
सध्या ज्या परीक्षा विद्यापीठाकडून घेतल्या जात आहे. त्यामध्ये परीक्षा केंद्रावर कोरोना बाबत कुठलीच खबरदारी घेतली जात नाहीयेत. विद्यार्थी कुठल्याही मास्क विणा आणि कुठल्याही कोरोना चाचणी विणा परीक्षा केंद्रावर येत आहे. त्यामुळे ही कोरोना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या असे निवेदन विधी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिले.यावरून सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदनाची प्रत दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.