आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे परीक्षार्थींसाठी तीन विशेष रेल्वेगाड्या:रेल्वे भरती बोर्डाची विविध पदांसाठी 12 जूनला परीक्षा, परीक्षार्थ्यांसाठी रेल्वेने केली सोय

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे भरती बोर्डाच्या वतीने विविध पदांसाठी रविवारी (12 जून) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहचता यावे, यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.

सिकंदराबाद, नागपूर आणि औरंगाबादसाठी तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. नांदेड ते सिकंदराबाद रेल्वे शुक्रवारी (10 जून) सायंकाळी 5.10 वाजता नांदेड येथून निघून सिकंदराबादला रात्री 11 वाजता पोहचेल. ही गाडी मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी आदी स्थानकांवर थांबेल. शुक्रवारी (10 जून) काझीपेठ येथून दुपारी 2.30 वाजता विशेष रेल्वे नागपूरसाठी रवाना होईल. शनिवारी (11 जून) रोजी सकाळी 10.30 वाजता रेल्वे नागपूर येथे पोहोचेल.

नागपूरहून काझिपेठसाठी रविवारी (12 जून) रात्री 10.30 वाजता रेल्वे निघून काझीपेठला सोमवारी (13 जून) सायंकाळी 7 वाजता पोहोचेल. ही गाडी पेट्टापल्ली, करीमनगर, लीन्गाम्पेत, जागीत्याल, कोरातला, मेतपल्ली, अर्मुर,निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पुर्णा, वसमत, हिंगोली, वासिम अकोला, बडनेरा आदी स्थानकांवर जाता-येताना थांबेल.

आदिलाबादहून औरंगाबादसाठी शुक्रवारी (10 जून) रात्री 9.30 वाजता निघून औरंगाबादला शनिवारी (11 जून) सकाळी 7 वाजता पोहोचेल, परतीच्या प्रवासात औरंगाबादहून सोमवारी सकाळी 6 वाजता निघून दुपारी 2.30 वाजता अदिलाबादला पोहोचेल. ही गाडी किनवट, सहस्त्रकुंड, बोधडी बुजुर्ग, हिमायतनगर, हदगाव रोड, नांदेड, पूर्णा, भोकर, मुदखेड, पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, रांजणी, जालना आदी स्थानकांवर थांबेल.

बातम्या आणखी आहेत...