आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काचेच्या पेटीत ठेवलेल्या बाळांचा रेटीना कमी होण्याचा धोका:धोका टाळण्यासाठी दरमहा 300 बाळांची तपासणी, त्वरीत निदानाने वाचेल दृष्टी

औरंगाबाद |रोशनी शिंपी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नऊ महिणे भरण्यापुर्वीच 3 ते 4 टक्के बाळ जन्माला येतात. अशा बाळांना ऑक्सिजन पेटीत ठेवल्याने डोळ्यांचा रेटीना कमी होण्याचा धोका होतो. मात्र, याचे वेळीच निदान आणि उपचार केल्यास दृष्टी वाचवणे शक्य आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागात रेटकॅम यंत्राच्या सहाय्याने महिनाभरात 300 बाळांची तपासणी करुन उपचार दिले जात आहेत. यामुळे कायमची दृष्टी गमावण्याचा धोका टाळला जातो, असे विभागप्रमुख डाॅ. वर्षा नांदेडकर यांनी सांगितले.

रेटीनाची तपासणी अचूक करणाऱ्या या यंत्राची किंमत 20 लाखांच्या आसपास आहे. घरात झालेली प्रसुती तसेच ग्रामीण भागात झालेल्या प्रसुतींमध्ये अनेकवेळा नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवण्याचा सल्ला विचारात घेतला जात नाही. यामुळे बालकांना अधंत्व येऊ शकते.

रेटीनो पॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी या आजारामुळे निर्माण होणारा दोष कायमचे अधंत्व देतो, त्यावर कोणताही उपचार जगात उपलब्ध नाही. मात्र, योग्यवेळी चाचण्या करुन घेतल्यास औषधोपचारांनी यावर मात करता येणे शक्य आहे, असे मत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तपन जख्खल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, खासगी रुग्णालयात जन्मलेल्या बांळांची ही तपासणी केली जाते. कारण, त्याठिकाणी येणारे पालक मध्यम वर्गातील तसेच जागरुक असतात. पण, ग्रामीण भागातील प्रसुती, घरीच झलेल्या प्रसुती तसेच अज्ञानामुळे पालकांनी दूलर्क्ष केल्यास नंतर गंभीर परिणामांना सामाेरे जावे लागते.

पंतप्रधान जन आरोग्य योजनेत होतो खर्च

घाटी रुग्णालयातील नवजात शिशु विभागात दाखल प्रत्येक बाळाची तपासणी केली जाते. काहींना नैर्सगिकरित्या हिलींग होऊन रेटीना नियमित होतो. काहींना औषधींची आवश्यकता असते, त्यांच्यावर उपचार केले जातात. याशिवाय अत्यंत कमी बाळांना इंजेक्शनची आवश्यता भासते. 18 ते 19 हजार रुपये किमतीच्या या इंजेक्शनचा खर्च पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून केला जातो. - डॉ. अझहर लोधी, रेटीना स्पेशलिस्ट घाटी नेत्ररोग विभाग

20 हजार बालक दरवर्षी गमवतात द़ृष्टी

ऑक्टोबर 21 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी 32 हजार 300 प्री मॅच्यूअर् बाळांना रेटिनो पॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी चे निदान होते. यापैकी 20 हजार बालक कायमची दृष्टी गमावतात.

बातम्या आणखी आहेत...