आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:औरंगाबादच्या इयत्ता दहावीच्या चैतन्य काळेची उत्कृष्ट कामगिरी; डिसेंट चिल्ड्रन्स मॉडेल प्रेसिडेन्सी स्कूल नासाच्या ह्युमन एक्सप्लोरेशन रोव्हर चॅलेंजचा मानकरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाशातील खडकाळ आणि तापमानात मानवरहित रोव्हर तग धरू शकेल, असे रोव्हर असणे आवश्यक असते. त्यामुळे अमेरिकेच्या नासाने यावर नुकतीच एक स्पर्धा घेतली. यात पंजाबच्या डिसेंट चिल्ड्रन्स मॉडेल प्रेसिडेन्सी स्कूलने उत्कृष्ट रोव्हर तयार केले. त्याचे औरंगाबादच्या चैतन्य काळेने ड्रायव्हिंग करून सादरीकरण केले. यात त्यांना ह्युमन एक्सप्लोरेशन रोव्हर चॅलेंज जाहीर करण्यात आला.

नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनतर्फे ह्युमन एक्सप्लोरेशन रोव्हर चॅलेंज ऑनलाइन स्पर्धा झाली. यात पंजाबच्या डिसेंट स्कूलच्या १३ जणांच्या टीमने सहभाग घेतला. तर एकूण ९१ संघानी सहभाग नोंदवला होता. नासाने २९ एप्रिल रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. ज्यामध्ये पंजाब, तामिळनाडूतील दोन विद्यार्थी गटांनी ह्युमन एक्सप्लोरेशन रोव्हर चॅलेंज जिंकले आहे. पंजाबच्या डिसेंट स्कूलच्या टीममध्ये औरंगाबादेतील दहावीच्या चैतन्य काळेचा सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...