आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या श्रीक्षेत्र जांब (जि. जालना) येथे श्रीमद ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा साजरा केला जातो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत हा कार्यक्रम झाला नव्हता, मात्र या वर्षी नुकताच हा कार्यक्रम झाला. त्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, अशी माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख गिरीश सातोनकर यांनी दिली.
दासबोध पारायणासह दररोज प्रभातफेरी, कीर्तन, संगीत प्रवचन, शास्त्रीय संगीत गायन, भजन, अभ्यास वर्ग आदी कार्यक्रम पार पडले. संत सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे प्रसाद महाराज यांनी सोहळ्यात भाविकांना मार्गदर्शन केले. मनोहर महाराज मुंढे डाबीकर (परळी) यांचे संगीत प्रवचन, कीर्तन, सखाराम बोरूळ (जालना) यांचे सतारवादन, सुवर्णमाला कुलकर्णी, डॉ. शरयू खेकाळे, डॉ. सीमा दडके (सेलू) यांचे गीतगायन झाले. दौलतराम महाराज कंद्राप यांनी ‘श्री समर्थ कथा’ सादर केली. शंतनू महाराज पाठक वालूर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली. उत्सवाच्या यशस्वितेसाठी बाबा महाराज मोगरे, मुंजाबा तांगडे, सचिन जोशी, जगन देवकर, बापूसाहेब शिरूरकर, स्वाती व विवेक चिक्षे आदींनी योगदान दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.