आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सपर्ट Q&A:व्यायाम, पुरेसे पाणी व पौष्टिक आहार हे हिवाळ्यात प्रभावी उपाय

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

Q. वय ४० वर्षे आणि वजन ५२ किलो आहे. उंची ५ फूट ४ इंच आहे. हिमोग्लोबिन ८ आहे. नेहमी थकवा जाणवतो. अतिशय थंडी वाजते. A. कमी हिमोग्लोबिनमुळे म्हणजेच अॅनिमियामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. यावर उपाय म्हणून लोहाच्या गोळ्या आणि भरपूर हिरव्या पालेभाज्या घ्या. याशिवाय पालेभाज्यांची कोशिंबीर, गाजर इ.चा आहारात भरपूर समावेश करा. डाळी, अंडी यांसारख्या कोणत्याही प्रकारच्या आहारात आढळणारी प्रथिने आपल्याला वारंवार होणाऱ्या सर्दीपासून संरक्षण देऊ शकतात. Q. हिवाळ्यात पाय आणि हात सुन्न होतात. पायाचे तळवे थंड राहतात. याचे कारण काय असू शकते? A. त्याची वयानुसार वेगवेगळी कारणे असू शकतात. उदा. ही समस्या ज्येष्ठ आणि वृद्धांमध्ये थर्मोरेग्युलेशनच्या कमतरतेमुळे, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी ३ ची कमतरता किंवा रक्त परिसंचरण समस्यांमुळे उद्भवू शकते. त्याच वेळी ही समस्या तुलनेने तरुण आणि महिलांमध्ये प्रामुख्याने लोह, कॅल्शियमची कमतरता किंवा थायरॉइडच्या समस्येमुळे उद्भवू शकते. Q. हिवाळ्यात ओठ जास्त का फुटतात, त्यांची काळजी कशी घ्यावी? A. कोणतेही चांगले मॉइश्चरायझर लावा, पुरेसे पाणी घ्या, सकस पौष्टिक आहार घ्या. मसालेदार, तेलकट पदार्थ टाळा. Q. हिवाळ्यात कोणत्या प्रकारची योगासने अधिक फायदेशीर आहेत? A. सर्व प्रकारचे प्राणायाम, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम, एरोबिक किंवा कार्डिओ वर्कआउट्स फायदेशीर आहेत. Q. मी ३० वर्षांचा आहे. डिप्रेशनचा रुग्ण आहे. मी हे औषध गेल्या १० महिन्यांपासून घेतोे. माझे संपूर्ण शरीर आणि हात पूर्णपणे थंड राहतात. असे का होते? A. मनोचिकित्सा, ध्यान इ.द्वारे नैराश्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. संबंधित औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कमीत कमी औषधे घ्या. अधिकाधिक नैसर्गिक उपायांचा अवलंब करा.

बातम्या आणखी आहेत...