आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रांचे प्रदर्शन:गुरुनानक जयंतीनिमित्त उद्यापासून शस्त्रांचे प्रदर्शन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुनानक यांच्या ५५३ व्या जयंतीनिमित्ताने शहरातील विविध गुरुद्वारांमध्ये तयारी सुरू झाली आहे. गुरुद्वारांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सत्संग, हजारो भाविकांना लंगर, शोभायात्रेच्या माध्यमातून जयंती साजरी होणार आहे. विशेष म्हणजे गुरूंचे शस्त्रांचे प्रदर्शनही भरवण्यात होणार आहे.

उस्मानपुरा गुरुद्वाराचे प्रमुख हरविंदर सिंग बिंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत बालशब्द कीर्तनाचा कार्यक्रम होईल. ६ नोव्हेंबर रोजी रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत लडीवालपाठ समाप्त होईल. सकाळी ८.३० वाजता माजी प्रमुख कुलदीपसिंग दोधी परिवारातर्फे निशाण साहिबच्या कपड्याची सेवा केली जाणार आहे. सकाळी ९ वाजता अखंड पाठ साहिबाचे उद्घाटन होईल. सायंकाळी ८ ते ९ या वेळेत भाई तरसेम सिंग यांचे शब्द होणार

७ नोव्हेंबर रोजी गुरुद्वारामध्ये खास रेन सबाई दिवाण ठेवले आहे. दुपारी १२.३० वाजता गुरूचे शस्त्र पाहण्यासाठी ठेवले जाईल. विशेषत: ही शस्त्रे अमृतसरहून औरंगाबादला आणण्यात येत आहेत. रात्री १ वाजता आरती होईल.

आठ रोजी शोभायात्रा, रक्तदान शिबिर
८ नोव्हेंबर रोजी ४.३० वाजता उस्मानपुरा येथील गुरुद्वारा येथून क्रांती चौक, पैठण गेट, शहागंजमार्गे शोभायात्रा निघेल. सकाळी ८ ते ५ या वेळेत रक्तदान शिबिर होईल. लंगरसाठी अध्यक्ष हरविंदरसिंग बिंदरा, जसपालसिंग ओबेरॉय, कुलदीपसिंग नीर, इंद्रजितसिंग छतवाल, प्रीतपालसिंग ग्रंथी, हरमेशसिंग खटवाला, ऋषिदास ओबेरॉय सहकार्य करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...