आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची साथ:पार्किंग, अतिक्रमण आणि स्वच्छता, पथदिव्यांची व्यवस्था करण्याची प्रशासनाकडून अपेक्षा

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ३० वर्षांत शहराने विविध क्षेत्रात भरारी घेतली. यासोबतच शहरातील मंदिरांनीही कात टाकली आहे. नव्या रूपात प्रत्येक मंदिर संस्थान व्यवस्था, सोयी-सुविधा आणि नवनिर्माण करत आहे. मात्र, मंदिरांना प्रशासनाची साथ मिळत नसल्याची खंत मंदिर व्यवस्थापनांनी दिव्य मराठीकडे व्यक्त केली. शहरात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी बदल होताना दिसत आहेत. अशा वेळी मंदिर संस्थान निभावत असलेले सामाजिक दायित्व आणि त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी दिव्य मराठीकडे व्यक्त केल्या.

दर चतुर्थीला वाहतुकीचा प्रश्न संस्थान गणपती मंदिर वर्षभरात अनेक लहान-मोठे उत्सव साजरे करतो. शहरातील ग्रामदैवत असल्याने याठिकाणी शहरातील प्रत्येक नागरिक वर्षातून एकदा येतोच. शहर वाढत गेले, पण पार्किंगची व्यवस्था मात्र राहून गेली. आता याठिकाणी वाहनांमुळे प्रचंड गर्दीची कोंडी होते. दर चतुर्थीला आम्ही पोलिसांना पत्र देत असतो. पण, नेहमीसाठीच या दिवसांत वाहतूक व्यवस्थेत बदल ठेवण्यात आला तर चांगले होईल. प्रफुल्ल मालाणी, सचिव, संस्थान गणपती ट्रस्ट

फुलवाल्यांचे अतिक्रमण ही डोकेदुखी मंदिरासोबतच पूजा साहित्याच्या दुकानांची भरभराट होते. मात्र, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास न होऊ देणेही गरजेचे आहे. गजानन महाराज मंदिराबाहेर फुले, पूजा साहित्याची अनेक दुकाने आहेत. यामुळे वाहनधारकांना त्रास होतो. वारंवार प्रयत्न करूनही यामध्ये काहीही बदल होत नाही. यासाठी आम्हाला प्रशासनाची मदत हवी आहे. मंदिराबाहेरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवणे गरजेचे आहे. उद्धव शिंदे, सचिव, गजानन महाराज मंदिर ट्रस्ट

पार्किंग आणि वाहतुकीची समस्या कठीण भक्ती गणेश मंदिर ट्रस्टने गेल्या काही वर्षांत वास्तूूमध्ये अनेक बदल केले आहे. सर्व्हिस रोडपलीकडील जागा पार्किंगसाठी आणि बसण्यासाठी विकसितही केली आहे. तरीही अनेक जण पार्किंग रस्त्यावर करतात. पार्किंग तर नीट करत नाहीत. मंदिर प्रशासनाला सहकार्य करणे ही नागरिक आणि भाविक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. पार्किंगचा प्रश्नही कायमस्वरुपी सोडवण्यात यावा. एस. एम. कुलकर्णी, भक्ती गणेश मंदिर ट्रस्ट विश्वस्त

येत्या काळात मंदिराचा चेहरा बदलणार अतिशय छोट्या वास्तूतून रेणुका माता मंदिराची सुरुवात झाली. २०१० पासून सतीश वैद्य यांनी या मंदिर प्रशासनाची धुरा सांभाळली. त्यांनी यामध्ये अनेक बदल केले. नेहमी मंदिराच्या विकास करण्यासाठी प्रयत्न सुरूच असते. भाविकांना या ठिकाणी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. यासाठी सातत्याने पुढाकार घेतला जातो. आज हे मंदिर सिडको भागात एक महत्त्वाचे मंदिर म्हणून नावारूपाला आले आहे. जगन्नाथ उगले, सहसचिव, रेणुका माता मंदिर

संस्थान गणपती नव्या रूपात येईल शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सणोत्सवाच्या मिरवणुकीची सुरुवात याच गणेशाला नमन करून होते. अनेक राजकीय घडामोडींचा हा गणराय साक्षीदार आहे. नवीन वास्तू निर्माण हाती घेतले जाणार आहे. ५५ लाखांचा १२ चौरस फुटांचा प्लॉट संस्थानने खरेदी केला. १२ चौरस फूट जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते पूर्ण होताच नव्या वास्तू निर्माणाचे काम सुरू होईल. संताेष चिचाणी, अध्यक्ष, संस्थान गणपती ट्रस्ट

भाविकांतील संवेदनशीलता कमी झाली रेणुकामाता मंदिर जळगाव रोडवर आहे. पूर्वी लोक कामावर येण्यापूर्वी मंदिरात येऊन दर्शन करून पुढे जायचे. मात्र, अलीकडील काळात वाहनावरूनच दर्शन घेण्याची प्रथा रूढ झाली आहे. यामुळे अनेकदा अपघातही घडतात. या विषयाकडे जाणीवपूर्वक पाहण्याची गरज आहे. आजचा काळ वेगाचा आहे. वेळ कुणाकडेच नाही. मंदिरांचे पावित्र्य राखणे, ही फक्त मंदिर प्रशासनाची जबाबदारी नाही तर भाविकांचीही आहे. दीपक पाठक, रेणुकामाता मंदिर, एन ९

समाज जडणघडणीत मंदिरांचा मोठा वाटा प्रत्येक पिढी आपले संस्कार आणि परंपरा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करत असते यामध्ये तिळमात्रही शंका नाही. पण, मंदिर यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. वर्षांचे ३६५ दिवस चोवीस तास विविध माध्यमातून समाजावर धार्मिक संस्कार करण्याचे काम केले जाते. यासाठी माणसांची फळी अहोरात्र राबते. समाजव्यवस्थेमुळे, जनहितात मंदिरांचे योगदान त्यामुळे समाजाने मंदिराच्या जडणघडणीतील आपला वाटा उचलला पाहीजे, अशी अपेक्षा आहे. मनोज पाडळकर, वरद गणेश मंदिर, अध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...