आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासगी विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्यााठी गेल्या 20 ते 22 वर्षापासून संघर्ष करावा लागतो आहे. अखेर शाळांना शासनाच्या वतीने 20 टक्के टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मात्र आधी विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर झालेल्या संचमान्यतेतून मिळणारे हे अनुदान आता विद्यार्थी आधार वैधतेशिवाय देण्यात येणार नसल्याने जिल्हयातील 119 शाळा मात्र टप्पा अनुदान मिळूनही अधांतरीच राहिल्या आहेत. आता या शाळांना 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थी आधार वैधता करुन घेतल्यावरच या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याने शाळा अहवालदिल झाल्या आहेत.
2009 मध्ये कायम विनाअनुदानित शाळांमधील कायम शब्द वगळण्यात आला हाेता. शासन नियमानुसार टप्प्या टप्प्याने अनुदान देण्यातची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र गेल्या वीस ते बावीस वर्षापासून अनुदान देण्यात यावेत. यासाठी खासगी शाळांकडून मागणी करण्यात येत होती. अंशत: अनुदानित शाळेतील वाढीव टप्पा अनुदानाची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
31 मार्चपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु शाळांची संचमान्यता विद्यार्थी पटसंख्ये ऐवजी आधार वैधतेवर करण्यात आली. शाळांना आधार नोंदणी किंवा अपडेट करण्यासाठी कधी सर्व्हर समस्या, आधार मधील चुकांमुळे पडताळणी होत नाही. त्यामुळे जवळपास 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे आधार अवैध ठरले आहे. आता 30 एप्रिलपर्यंत आधार वैधतेची प्रक्रिया करा आणि टप्पा अनुदान मिळवा. या प्रकारामुळे शाळांकडून शिक्षण विभागात धावाधाव केली जात आहे.
असे अनुदान मंजूर
30 एप्रिल पर्यंत मुदत
माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख म्हणाले की, जिल्हयातील 119 शाळांना टप्पा अनुदान मंजुर झाले आहे. 20, 30 आणि 40 असे त्याचे टप्पे आहेत. परंतु यासाठी शाळांना प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे आधार वैध आणि अपडेट असणे आवश्यक आहे. त्यासाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत आहेत. या आधारावरच टप्पा अनुदान मिळेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.