आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:गँस टाकीचा स्फोट, संसारोपयोगी साहित्यासह घर उध्दवस्त, सुदैवाने जिवितहानी नाही

गेवराई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गेवराई तालुक्यातील राजपिंप्री जवळील मळसी तांडा येथील घटना

गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथून जवळच असलेल्या मळसी तांडा येथील गुलाब गेमा चव्हाण यांच्या घरातील गँस सिलेंडरचा स्फोट होवुन घरातील संसारोपयोगी वस्तूसह धान्य व इतर जिवनावश्यक वस्तु खाक झाल्या. तसेच घर देखील उधवस्त झाले आहे. सुदैवाने यावेळी घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेल्याने जिवित हानी झाली नसुन ही घटना मंगळवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.   या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील मळसी तांडा गावात गुलाब गेमा चव्हाण यांचे कुटुंब राहत आहेत. मंगळवारी रोजच्या प्रमाणे घरातील सर्व सदस्य सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शेत कामासाठी शेतात गेले. दरम्यान सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक घरात गँस टाकीचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट ऐवढा भिषण होता की, परिसरात देखील घबराट पसरली होती. सिलेंडर स्फोटाच्या तिव्रतेने तांडा हादरून गेला. तर या घटनेत घराची मोठी पडझड झाली असून घरावरील पत्रे उडून बाजुला पडले होते. तसेच घरातील धान्य, कपडे यासह संसारापयोगी साहित्य जळून खाक झाल्याने चव्हाण यांचा संसार उघड्यावर आला आहे. आसपासच्या घरालाही काही प्रमाणात हादरे बसले होते. या घटनेची माहिती संबंधीत पोलिस ठाण्याला कळविण्यात आली होती. दरम्यान या घटनेत चव्हाण यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...