आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात अवैधवाळू उपसा करण्यासाठी आणलेल्या दोन बोट हट्टा पोलिस अन महसुल विभागाच्या पथकाने सोमवारी ता. १५ सायंकाळी स्फोटकांनी उडवून दिल्या. या प्रकरणात संबंधित बोट मालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे या रेती घाटाचा लिलाव झाला नसतांनाही त्यातून वाळू उपसा केला जात आहे. वाळू उपसा करणे सोपे व्हावे यासाठी वाळू तस्करांनी दोन बोट देखील आणल्या होत्या. या बोटीच्या माध्यमातून दिवसरात्र वाळू उपसा करून त्याचा साठा करून ठेवला जात होता.
दरम्यान, या ठिकाणी दोन बोट द्वारे वाळू उपसा होत असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार राठोड, राजेश ठाकूर, वळसे, सांगळे, गजभार, चव्हाण, पाईकराव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पूर्णा नदीच्या पात्रात दोन बोट असल्याचे दिसताच या बाबतची माहिती पोलिसांना औंढा नागनाथ तहसील कार्यालयास दिली. तहसीलदार कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सचिन जोशी यांच्यासह कर्मचारी दाखल झाले.
त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विहीरीच्या खोदकामासाठी स्फोटकांचा वापर करणाऱ्या परवानाधारकांना बोलावून या बोट स्फोटकांद्वारे उडवून देण्यात आल्या. या एका बोटची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात बोट मालकांचा शोध घेऊन त्याच्यावर हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.