आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड स्फोटक प्रकरण:उधारी देत नसल्याने ठेवले स्फोटक, कन्नडमधील प्रकरणात तरुणाला अटक, 5 दिवसांची पोलिस कोठडी

कन्नड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड शहरात मोबाइलच्या बॉक्समध्ये ठेवलेले स्फोटक (इम्प्रूवाइज्ड एक्स्पोसिव्ह डिव्हाइस) निकामी करताना त्याचा स्फोट झाला होता. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड पोलिसांनी तीन दिवसांनंतर छडा लावला. यात एका आरोपीला जेरबंद केले आहे. उधारीचे पैसे देत नसल्याने रागात रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे (२६, रा. म्हाडा कॉलनी, कन्नड) याने फर्निचरच्या दुकानासमोर स्फोटक ठेवल्याचे चौकशीतून समोर आले आहे. कन्नड न्यायालयाने रामेश्वरला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

रामेश्वरचे शहरातील हिवरखेडा रोड येथे न्यू स्वराज इलेक्ट्रॉनिक्स आणि रुद्र रेफ्रिजरेटर नावाचे दुकान आहे. ज्या फर्निचरच्या दुकानाबाहेर त्याने बॉम्ब ठेवला होता त्या किरण राजगुरू याचा चुलत भाऊ दिनेश राजगुरू याच्यात आणि रामेश्वरमध्ये मागील दोन वर्षांपासून आर्थिक वाद सुरू होता. रामेश्वरने किरणला हा वाद मिटवण्यासाठी मदतही मागितली होती. मात्र तो वाद मिटत नसल्याने रागाच्या भरात राजगुरू यास धडा शिकवण्यासाठी त्याने हा प्रकार केला. औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी चार पथके नेमली होती. शनिवारी सायंकाळीच त्यास ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस निरीक्षक रवींद्र तळेकर, उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप ठुबे, सतीश बढे, पिशोर, सोनार, कन्नड शहर पोलिस अंमलदार स्थागुशा सय्यद झिया, गजानन लहासे, संजय काळे, नामदेव सिरसाठ, विठ्ठल राख, लहू थोटे आदींनी तापसकामी सहभाग नोंदवला आहे.

असा लागला प्रकरणाचा छडा
रामेश्वरने ठेवलेल्या बॉम्बमध्ये इलेक्ट्रिक किट होती. त्यामुळे पोलिसांनी भौतिक पुरावे आणि किटची बांधणी तसेच बॉम्ब हा सार्वजनिक ठिकाणी नसल्याने घटनेचा सखोल अभ्यास केला. एकानंतर एक सर्व घटनांचा मेळ लावला. तांत्रिकदृष्ट्या योग्य दिशेने शिताफीने तपास करत आरोपीचा माग काढला आणि या प्रकरणाचा छडा लावला.

बातम्या आणखी आहेत...