आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मराठवाड्यात बँकांच्या शाखा वाढवा, कृषी कर्जपुरवठा वेळेत करा : डॉ. भागवत कराड

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात एसबीएचचे एसबीआयमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर मराठवाड्यात बँकांच्या शाखा कमी झाल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यात बँकिंगचे जाळे वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा वाढवण्याच्या सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी राष्ट्रीय बँक परिषदेत संबंधित बँकाच्या अध्यक्षांना गुरुवारी दिल्या. त्याला बँकांच्या वतीनेदेखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. विशेष म्हणजे बँकांच्या शाखा कमी होत असल्याबाबतचे वृत्त आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे केवळ ४० टक्के कृषी कर्जवाटप या ‘दिव्य मराठी’च्या बातम्यांचा उल्लेख करत डॉ. कराड यांनी बैठकीत चर्चा केली. मराठवाडा विकासाचे अर्थचक्र गतीने फिरण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या मोठ्या प्रमाणात शाखा गरजेच्या आहेत, असे डॉ. कराड म्हणाले. या वेळी बँकांच्या अध्यक्षांनीदेखील खरिपाच्या कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

मुद्रा लोनच्या अडचणी दूर करा
बैठकीत कराड यांनी मुद्रा लोनबाबत सर्वाधिक तक्रारी असल्याचे सांगून राज्यासह मराठवाड्यात ही समस्या आधिक असल्याचे स्पष्ट केले. तसेच मराठवाड्यातील मुद्रा लोनबाबतच्या अडचणी सोडवण्याचा सूचना बँँकांना दिल्या.

बँकांच्या ऑनलाइनबाबतही केली चर्चा
वेळेत कर्जपुरवठा व्हावा, अशी अपेक्षा डॉ. कराड यांनी व्यक्त केली. कर्जपुरवठा सुरू होतो त्याच वेळी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. त्यामुळे यावर काही तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच औरंगाबादमध्ये ऑनलाइन कृषी कर्जपुरवठा करण्यात येत असून त्यामुळे कर्जपुरवठा वाढल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्य सरकारमुळे रेल्वे प्रकल्प अडचणीत
औरंगाबाद | राज्य सरकारने पन्नास टक्के हिस्सा देणे बंद केल्याने राज्यातील सर्व रेल्वे प्रकल्प अडचणीत आले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने गुरुवारी (१६ सप्टेंबर) राष्ट्रीयीकृत बँकांच्या अध्यक्ष, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक हॉटेल ताज येथे झाली. त्यात ‘सामान्य लोक आणि लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योजकांसाठी बँकेच्या योजना’ विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...